दुष्काळात खळखळला माणूसकीचा झरा !



दामोधर गारोळे यांच्या याच शेतातील विहीरीतून
 शास्त्री नगरातील नागरिकांना 
केला जातो मोफत पाणी पुरवठा 
दुष्काळाच्या गडद छायेने महाराष्ट्र होरपळून निघत असतांना विहिरीच्या पाण्याने गाठलेल्या तळाने पाण्याच्या एका थेंबासाठी महिलावर्गाची होणारी परवडीचे वृत्त वृत्तपत्रातून नियमीत वाचण्यात येते. मात्र कोराडी जलप्रकल्प जवळ असतांना सुध्दा हिवरा आश्रम येथे मेहकर चिखली  रस्ता रूंदीकरणा दरम्यान जेसीबीच्या खोदकामात पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन जागोजागी  खंडीत झाल्यामुळे हिवरा आश्रम वासियांना गेल्या २५ ते ३० दिवसापासून पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याची बाब लक्षात घेऊन पाण्याविना होणारे नागरीकांची हेळसांड लक्षात घेत हिवरा आश्रम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी सरपंच दामोधर संपत गारोळे यांनी आपल्या शेतातील विहिरीवरून पाईप लाईन टाकून शास्त्री नगराला पाणी पुरवठा करून आपल्या सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडवून आणले. गेल्या २५ ते ३० दिवसापासून नागरीकांची होणारी पाण्यासाठी पायपीटाला यानिमित्ताने पूर्ण विराम मिळाल्याने नागरीकांमध्ये महिलामंडीळीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दामोधर गारोळे यांचे शेत गावापासून किमी अंतरावर आहे. त्यांनी स्वतःच्या विहिरीवरून ३० ते ३५ पाईप टाकून शास्त्री नगराला पाणी पुरवठा केला आहे. गेल्या एक महिन्यापासून भिमनगर,वार्ड क्र.,वार्ड क्र. मध्ये पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरीकांची पाण्यासाठी पायपीट होत आहे. कोराडी धरणामध्ये जलसाठा असून देखील पाणी मिळणे कठीण झाले आहे. तरी संबंधीत ठेकेदारांनी तोडलेली पाईप लाईन लवकरात लवकर जोडून देण्यात यावी अशी मागणी यानिमित्ताने जोर धरीत आहे. या सामाजिक बांधीलकीमुळे दामोधर गारोळे यांचे कौतुक होत आहे.

 नागरिकांची होणारी पाण्यासाठी होणारी परवड लक्ष्यात घेऊन मोफत पाणी वाटपाचा निर्णय घेतला. जोपर्यंत रस्त्याचे काम काम सुरू आहे तोपर्यंत नागरीकांना नियमीत तिस-या दिवशी पाणी पुरवठा करू.

                                              दामोधर गारोळे हिवरा आश्रम


सामाजिक बांधीलकीचे दर्शन 
नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट  व त्रास लक्षात घेत हिवरा आश्रम येथील दामोधार गारोळे यांनी आपल्या शेतातील विहीरीवरुन पाईप लाईन द्वारे शास्त्री नगरातील नागरिकांची मोफत पाणी वाटप करून पाण्याची समस्या दूर केली. 

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा