Responsive Ads Here

रविवार, १२ मे, २०१९

सावित्रीच्या लेकीची डेअरी व्यवसायात झेप


जिद्द,चिकाटी,मेहनत कठोर परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील महिला सुध्दा आपल्या कर्तृत्वाने यशाची शिखरे यशस्वीपणे पादाक्रांत करू शकतात याचाच प्रत्यय हिवरा आश्रम येथील सुशिक्षीत महिला सौ.मनिषा एकनाथ आव्हाळे यांनी सुरू केलेल्या आदित्य दुध डेअरी अ‍ॅन्ड डेली निडस या व्यवसायाच्या रूपाने दिसून येतो. ग्रामीण महिला सुध्दा कुठलाही व्यवसाय तितक्याच यशस्वीपणे सुरू करू शकतात ही प्रेरणा इतर  महिलांना दिली आहेमनिषा आव्हाळे यांनी दुध डेअरी या पुरूषांच्या मक्तेदारी असलेल्या व्यवसायात त्यांनी भरभक्कमपणे पाय रोवले आहे. दुध संकलन वितरणातून त्यांनी आर्थिक प्रगती साधली आहे.
कौटुंबिक जबाबदारी पार पाडत हिवरा आश्रम सारख्या खेडयात दुध संकलन वितरणाचा व्यवसाय यशस्वीपणे पार पाडला. त्यांनी सुरू केले या व्यवसायातून इतर महिलांसाठी त्या ऑयकॉन ठरत आहेत. ग्रामीण भागात महिला व्यवसायीका म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. मनिषा एकनाथ आव्हाळे या उच्चशिक्षीत असून त्यांनी दुध डेअरी व्यवसाय सुरू करण्याचा मानस पती एकनाथ आव्हाळे यांच्या कडे व्यक्त करून पतीच्या होकारा नंतर हा व्यवसाय समर्थपणे सुरू केला आहे. दुध संकलनाचा व्यवसाय परवडत नाही म्हणून अनेकांनी दुध संकलन व्यवसायाकडे पाठ फिरवीली असतांना योग्य गुणवत्ता योग्य नियोजनातून मनिषा एकनाथ आव्हाळे यांनी ग्रामीण भागात दुध संकलनाचा व्यवसायात यशस्वी होवू शकतो हे सिध्द केले आहे. मनिषा आव्हाळे यांनी व्यवसायातील चिकाटीने दुध संकलन व्यवसाय यशस्वी केला महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने आपला ठसा उमटवला आहे. दुध व्यवसायिकांच्या दुधाला फॅटनुसार चांगला भाव मिळतो. या डेअरीमध्ये दररोज १५० ते २०० लिटर गायी,म्हशीच्या दुधाचे संकलन केल्यानंतर ग्राहकांना दुधाचे वितरण होते.

मुल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती
प्रत्येक हंगामानुसार पदार्थाची मागणी कमी-जास्त होत असते. पनीरला दररोज म्हणजे पाच किलोपर्यंत मागणी राहते. हंगामात दिवसाला २० लिटर दही, ताक विक्री होते. दुध संकलन व्यवसायात अतिरीक्त दुधापासून दही,तुप,पनीर,ताक,श्रीखंड अशी उत्पादनाची निर्मिती करून मनिषा आव्हाळे यांनी  दुध संकलन व्यवसायाचे अर्थकारण सुधारले आहे. 

२०० ते ३०० लिटर दुधाचे संकलन वितरण
हिवरा आश्रम ही जवल्पासच्या ३० ते ४० गावाची मोठी बाजारपेठ आहे. हिवरा आश्रम येथे मोठा नोकरदार वर्ग असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दुधाची विक्री होते. आदित्य दुध डेअरी अ‍ॅन्ड डेली निडस मध्ये दररोज जवळपास २०० ते ३०० लिटर दुधाचे संकलन वितरण होते.

ग्रामीण भागातील महिलांनी  आत्मविश्वासाने व्यवसाय सुरु केला तर यश मिळतेच. या भावनेतून दूध डेअरी सुरु केला.
                                                        मनीषा एकनाथ आव्हाळे.हिवरा आश्रम


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा