Responsive Ads Here

सोमवार, ६ मे, २०१९

विवेकानंद आश्रम देणार शेतक-यांना मोफत कृषिसल्ला !



बुडते हे जन देखवेना डोळा बुडत। म्हणोनि कळवळा येतो आम्हां या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे संतांनी वेळोवेळी समाजाच्या हिताचाच विचार केला. समाजाची अधोगती होऊ नये म्हणून त्यांना वेळोवेळी हितोपदेश केला.या न्यायाने कर्मयोगी संत प पू शुकदास महाराज यांनी एका दशका अगोदरच सेंद्रिय शेतीची कास धरा असे शेतकरी बांधवांना आवाहन केले होते. विषमुक्त  अन्न पिकविण्यासाठी व त्याकरिता ग्रामीण भागातील शेतक-यांना मोफत मार्गदर्शन करण्यासाठी कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमाने पुढाकार घेतला असून, विवेकानंद कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत मोफत कृषी सल्ला व सेवा देण्यात येणार असल्याची माहिती विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी व उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांनी दिली आहे. 
रासायनिक खतांचा झालेला अतिरेकी वापर, पिकांवर फवारणी करण्यात आलेली कीड व कीटकनाशके यांचा अंश पिकांत उतरून माणसे कर्करोगाची भक्ष्य झाली आहेत, असा सिद्धांत कर्मयोगी संत तथा कृषितज्ञ प. पू. शुकदास महाराज यांनी दशकभरापूर्वी  मांडला होता. 
समाजाचे स्वास्थ्य चांगले रहावे, विषमुक्त अन्नाची निर्मिती व्हावी, यासाठी विवेकानंद आश्रमाने पुढाकार घेतला असून, त्यासाठी विवेकानंद कृषी महाविद्यालयामार्फत मोफत कृषी सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरु केल्या जात आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर मंगळवार ता.७ रोजी हे केंद्र विवेकानंद आश्रमाच्या परिसरातील कृषी महाविद्यालयात सुरु होत आहे. 
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांकडे येणा-या बहुतांश कॅन्सर रुग्णांचा त्यांनी अभ्यास केला असता, त्यांच्या असे निदर्शनास आले, की कॅन्सरसाठी भाजीपाला, कडधान्ये व फळे यांच्यामार्फत पोटात गेलेले विषारी घटक, कीड व कीटकनाशकांचे अंश हे त्याला कारणीभूत आहेत. कीटकनाशके, बुरशीनाशके आणि जंतुनाशकांची केली गेलेली फवारणी आणि रासायनिक खतांचा झालेला वापर व त्यातील रसायने धान्ये, भाज्या व फळांमध्ये उतरतात. हे अंश अन्नाद्वारे खाण्यातून रक्तापर्यंत पोहोचतात. त्यांचा रक्तघटक आणि रक्तातल्या पेशींवर परिणाम होतोव त्यातून कर्करोग होतो, असे पू. शुकदास महाराज यांनी सांगितले होते.

तज्ञ प्राध्यापक करणार मार्गदर्शन 
विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे तज्ज्ञ प्राध्यापक सकाळी ८ ते ९ व सायंकाळी ५ ते ६ यावेळात शेतकèयांना मोफत मार्गदर्शन करणार आहेत. त्यात कृषी कीटकशास्त्र विभागाचे प्रा. एस. पी. काकडे (९९६०६८६१८२) व डॉ. बी. एन. भोंडे (८३७८८४४८४८), वनस्पती विकृती शास्त्र विभागाचे प्रा. व्ही. बी. हमाने (९५५२१६९६५८) व आर. आर. काळे (९६८९३३३९६६), तर कृषी विद्या विभागाचे प्रा. एस. डी. जाधव (८८०५३१३९०९) यांचा मार्गदर्शक मंडळात समावेश आहे.

ग्रामीण कृषक पुत्रांना मिळणार कृषी सल्ला 
समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांनी विषमुक्त शेती करण्यावर भर द्यावा हि कर्मयोगी संत प पू शुकदास महाराजांची इच्छा होती. विषमुक्त अन्नाची निर्मिती व्हावी, यासाठी विवेकानंद आश्रमाने पुढाकार घेतला असून, त्यासाठी विवेकानंद कृषी महाविद्यालयामार्फत मोफत कृषी सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरु केल्या जात आहे. अक्षय्य तृतियेच्या मुहुर्तावर (दि.७ मे) हे केंद्र विवेकानंद आश्रमाच्या परिसरातील विवेकानंद कृषी महाविद्यालयात सुरु होत आहे. या केंद्रामार्फत शेतकर्‍यांना शेतीविषयक सर्वतोपरी मार्गदर्शन करण्यात येणार असून, माती व पाणी परीक्षण करण्यात येऊन मातीचा पोत पाहून कृषी निविष्ठाविषयक सल्लाही देण्यात येणार आहे.
  
सेंद्रिय खते पुरविण्यासाठी आश्रमाचा पुढाकार 
विवेकानंद आश्रमाच्या तब्बल दीडशे एकर शेतीत विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे निष्काम कर्मयोगी संत पू. शुकदास महाराज यांनी बासमती गहू, पिवळी ज्वारी यासह काही वाणांचे संशोधन केलेले आहे. तब्बल दीडकोटी रुग्णांना व्याधीमुक्त करणारे ते उत्कृष्ट डॉक्टरही होते. त्यांच्याकडे येणार्‍या बहुतांश कॅन्सर रुग्णांचा त्यांनी अभ्यास केला असता, त्यांच्या असे निदर्शनास आले, की कॅन्सरसाठी भाजीपाला, कडधान्ये व फळे यांच्यामार्फत पोटात गेलेले विषारी घटक, कीड व कीटकनाशकांचे अंश हे त्याला कारणीभूत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवाना विषमुक्त शेती करण्याची प्रेरणा देण्यासाठी विवेकानंद आश्रम सेंद्रिय खते अल्प दरात उपलब्ध करून देणार आहे.


कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या संकल्पनेतील सेंद्रिय शेती पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी मोफत कृषी सल्ला व माफक दरात कृषी निविष्ठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय विवेकानंद आश्रमाने घेतला आहे.
                                      संतोष गोरे,सचिव विवेकानंद आश्रम

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा