सद्याचे युग हे स्पर्धेचे व धकाधकीचे आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे आहार व विहारात खूप बदल झाले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे माणसाच्या आरोग्यावर परिणाम झाले असून त्यामुळे माणसाला अनेक आजार जडत आहे. आधुनिक जीवनशैलीत आरोग्य सांभाळा असे विचार आ.डॉ.संंजय रायमूलकर यांनी येथूनच जवळ असलेल्या प्रती पंढरपूर देऊळगांव माळी येथे आयोजीत मोफत आयुर्वेदीक रोग निदान शिबीराच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना काढले.
संत जनार्धन स्वामी सदगुरू सेवाश्रम,ॠषीवेद हर्बल प्रॉडक्ट प्रा.लि. हरिव्दार,जे.एम.डी.मेडिको सव्र्हीसेस लिमिटेड मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने देऊळगांव माळी येथे भव्य मोफत आयुर्वेदीक रोग निदान शिबीराचे उदघाटन प्रसंगी गुरूवार ता.२० ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स.सदस्य शिवप्रसाद मगर हे होते तर प्रमख पाहूणे म्हणून मेहकरचे ठाणेदार ए.एम प्रधान,अध्यक्ष बळीराम गिरी महाराज,विठ्ठल रूखमिनी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव मगर,बि.के.सुरूशे,ग्रा.प.सदस्य सचिन मगर,श्रीराम बळी,हभप नवले महाराज,प्रकाश महाराज,सखा पाटील,विश्वबंर भराड,डॉ.नरहरी मगर,डॉ.गजानन गि-हे,डॉ.सुजाता भराड,डॉ.कु.वर्षा बळी तथा आदींची उपस्थिती होती. या दोन दिवशीय भव्य मोफत आयुर्वेदीक शिबीराचा सुमारे ४०० ते ५०० गरजू रूग्णांनी लाभ घेतला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन उत्सव समितीचे अध्यक्ष राजेश मगर पाटील यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा