Responsive Ads Here

गुरुवार, २० डिसेंबर, २०१८

किमया बुधवाणी ठरली बालवैज्ञानीक




ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी.शालेय विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व संशोधनवृत्तीला चालना मिळावी म्हणून येथील कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद ज्ञानपीठामध्ये दि.१८ डिसेंबर ते १९ डिसेंबर रोजी दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये कु.किमया कमलेश बुधवाणी हिच्या लाय फाय हे  उपकरण तालुकास्तरावर प्रथम आले. ग्रामीण भागातील या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये मेहकर तालुक्यातील २२८ बालवैज्ञानिकांनी आपली विज्ञान उपकरणे घेवून सहभाग नोंदविला होता. कु.किमया बुधवाणी ही विवेकानंद आश्रमाचे माजी सचिव तथा विवेकानंद विद्या मंदिरातील कार्यरत असलेले शिक्षक कलेश बुधवाणी यांची मुलगी आहे. किमया हीला लहानपणापासून विज्ञान विषयाची आवड आहे. कमलेश बुधवाणी हीने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
मेहकर तालुका विज्ञान संघटना व शिक्षण विभाग व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने हिवरा आश्रम येथील विवेकानंद ज्ञानपीठात दोन दिवशीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये तालुक्यातील २२८ विद्यार्थ्यांनी आपली उपकरणासह सहभाग नोंदविला होता.या तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शनीमध्ये उच्चप्राथमिक गटातून कु.किमया कमलेश बुधवाणीने प्रथम क्रमाक पटाकाविला आहे. कु.किमया बुधवाणी ही मेहकर येथील सेंट्रल पब्लीक स्कुलची इयत्ता सहावीची विद्यार्थीनी आहे. कु.किमया हीने लाय फाय स्मार्ट सिटी हे उपकरण बनविले होते. तिच्या लाय फाय स्मार्ट सिटी उपकरण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्रथम आले. 

कु.किमयाला हिला शिक्षका वर्षा लंबे व प्राचार्य गजानन निकस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे,मेहकर तालुका विज्ञान संघटनेचे अध्यक्ष भागवत दळवी,विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,प्राचार्य अणाजी सिरसाट,पंढरीनाथ शेळके तथा आqद मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कु.किमया बुधवाणी चा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. कु.किमया बुधवाणीचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.

असे आहे लाय फाय उपकरण
स्मार्ट फोनमधून एलईडी लाईटला ऑडिओ सिग्नल दिले.समोर असलेल्या सोलर पॅनलमध्ये सदर डाटा रिसिव्ह होतो. त्यानंतर सिग्नलचे आऊटपुट अ‍ॅम्पलीफायरच्या मदतीने स्पीकरला दिला. अशा प्रकारे डाटा ट्रान्सफर होतो. लाईट फिडेलीटी हे डाटा ट्रान्सफरचे इकोफ्रेन्डली माध्यम असून त्यांचा मानवी आरोग्यावर कुठलाही दुष्परीणाम होत नाही.


विज्ञानप्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा व संशोधक वृत्तीला चालना मिळते. विद्यार्थ्यांनी विज्ञानप्रदर्शनी सहभाग घेवून नवनवीन उपकणाची निर्मितीतून आपली क्षमता सिध्द करावी
             कु.किमया कमलेश बुधवाणी हिवरा आश्रम


संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा