चला, बनूया स्मार्ट ! ''फुल टू स्मार्ट'' च्या सोबतीने !!


दैनिक सकाळ समूह हा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतो. दैनिक सकाळ समूह हा शालेय दशेपासूनच विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावीज्ञानार्जनातील निर्भेळ आनंद त्यांना सहज लुटता यावालहानग्यांच्या बालमनावर वाचनाचे संस्कार रूजवून त्यांची ज्ञानसंपदा वृध्दींगत करण्याकडे भर देत आहे. आपल्या पाल्याच्या ज्ञानसंपदेत भर पाडण्याच्या दृष्टीने सकाळ समूहाने ''फुल टू स्मार्ट'' हे ज्ञानवर्धक सदर सुरू केले आहे.
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेच्या युगात आपल्या पालक टिकावा ही प्रत्येक पालकाची मनोमन इच्छा असते. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर अभ्यासासोबत अवांतर वाचनाला सुध्दा तितकेच महत्व आहे. अवांतर वाचनाने ज्ञानात भर पडते. हा उदात्त हेतू डोळयासमोर ठेवून दैनिक सकाळ समूहाने दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ''फुल टू स्मार्ट'' उपक्रम सुरू केला आहे. शैक्षणिक अभ्यासासोबतच भविष्यात स्मार्ट विद्यार्थी होण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासाठी हा उपक्रम निश्चित मदत करणार आहे.
''फुल टू स्मार्ट'' मुळे विद्यार्थ्यांतील जिज्ञासा,चिकित्सा व बुध्दिमत्तेचा विकास होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानार्जनाची गोडी निर्माण करणार आहे. दैनिक सकाळ समूह हा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोपरी अग्रसेर आहे.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना अग्रोवन वितरण प्रतिनिधी अकोला जिल्हा सचिन अवसरमोल,हिवरा आश्रम प्रतिनिधी संतोष थोरहाते यांनी ''फुल टू स्मार्ट'' ची माहिती दिली. दैनिक सकाळ समूहाच्या या उपक्रमामध्ये मोठया संख्येने सहभागी होण्यासाठी सांगीतले. यावेळी विद्यार्थ्याचा उत्साह दिसून आला. यावेळी विवेकानंद विद्या मंदिराच्या प्राचार्य अणाजी सिरसाट यांना ''फुल टू स्मार्ट'' ची सुध्दा माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांसाठी बक्षिसांचा खजिना
विद्यार्थी मित्रांनोतुमच्यासाठी खूशखबर ! माहितीचा आणि त्याचबरोबर बक्षिसांचा मोठा खजिना तुमच्यासाठी पुन्हा खुला होत आहे. सातत्याने नवनवीन माहिती देणारा सकाळ समूह तुमच्यासाठी माहितीमनोरंजनाचा खजिना असलेले 'फुल टू स्मार्ट'' हे पान व बक्षिसे मिळवून देणारी स्पर्धा घेऊन येत आहे. विविध विषयांवरील माहिती वेगवेगळ्या सदरांतून वाचायला मिळेल. 'फुल टू स्मार्ट'' मधून ज्ञानार्जन सोबत बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. सकाळ फुल टू स्मार्ट मधील लेख वाचून त्या प्रश्नांची उत्तरे देवून फक्त ८० कूपन चिकटावे लागणार आहेत. 'फुल टू स्मार्ट''  मधील सहभागी विद्यार्थ्यांना स्पोर्टस बँग आणि प्रमाणपत्र मिळणार आहे. 'फुल टू स्मार्ट''  मधील प्रश्नांची उत्तरे देवून आपला पाल्य बक्षिसे सुध्दा जिंकणार आहे.

''फुल टू स्मार्ट'' ज्ञानवर्धक सदर
आपल्या पाल्याच्या ज्ञानसंपदेत भर पाडण्याच्या दृष्टीने सकाळ समूहाने ''फुल टू स्मार्ट'' हे ज्ञानवर्धक सदर सुरू केले आहे. ''फुल टू स्मार्ट'' मध्ये लहान मुलांच्या ज्ञानकक्षा वृध्दींगत होण्याच्या दृष्टीने सुविचारदिनविशेष ,हास्यकट्टाकिलबिलटेक्नो हंटकीप फिटस्लॅम बुक अशी ज्ञानवर्धक सदरे वाचायला मिळणार आहेत. मुलांना मिळणार ज्ञानाचा खजिना,सव्वा कोटींच्या बक्षिसांचा नजराणा! ''फुल टू स्मार्ट'' पाडणार आपल्या लहानग्यांच्या ज्ञानसंपदेत भर !

संतोष थोरहाते 
पत्रकार दैनिक सकाळ 
मो.९९२३२०९६५८
'श्रीनिवास' विवेकानंद नगर हिवरा आश्रम 
ता,मेहकर जि.बुलडाणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा