Responsive Ads Here

शनिवार, २४ ऑगस्ट, २०१९

पशू संगोपन व संवर्धनातून उत्कर्ष साधा- आ.डॉ. संजय रायमूलकर


निसर्गाच्या लहरीपणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शेतक-यांनी शेतीसोबत पशू संगोपन करून दुध व्यवसाय सुरू करावा. पशू संगोपन संवर्धनातून उत्कर्ष साधावा असे विचार  आमदार डॉ.संजय रायमूलकर यांनी विवेकानंद आश्रमात आयोजित केलेल्या गोकुळाष्टमी निमित्त गायींचे प्रदर्शन,आरोग्य तपासणी उत्कृष्ट गायींना बक्षिस वितरण या कार्यक्रमातून बोलतांना व्यक्त केले.
प्रमुख पाहूणे खा.प्रतापराव जाधव पंदेकृवि चे कार्यकारी सदस्य विनायकराव सरनाईक होते. या कार्यक्रमात परीसरातून शेकडो गोपालक आपल्या गायी या प्रदर्शनीत घेवून आले होते.या प्रदर्शनीमध्ये ७५ गायींचा सहभाग होता. या प्रदर्शनीत सुदृढ, जास्त दुध देणारी देखण्या गायीला बक्षिसे दिले जातात. कार्यक्रमाच्या सुरूवातील खा.प्रतापराव जाधव यांनी गोपूजन केले प्रदर्शनातील गायींची पाहणी करून शेतक-यांशी संवांद साधला.त्यांच्या हस्ते वृक्षारोपनही करण्यात आले
विवेकानंद कृषी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात संकरीत गटात आदित्य केंदळे,अमोल आव्हाळे तर देशी गटात अरूण काळे,संदीप वाहेकर,गोपाल होणे या गोपालकांनी बक्षिसे पटकावली. यावेळी हभप एकनाथ महाराज येवले यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले. या कार्यक्रमाला विवेकानंद आश्रमाचे सर्व पदाधिकारी,महाविद्यालयीन कर्मचारी,परीसरातील गोपालक बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यकमाचा समारोप महाप्रसाद वितरणाने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेकानंद कृषी महाविद्यालय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन प्रा.मिनाक्षी कडू तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ.सुभाष कालवे यांनी मानले.


सुदृढ गायीचे मूल्यमापन बक्षिसे
यावेळी सुदृढ गायींचे पशू वैद्यकिय चमूव्दारे गायींचे मूल्यमापन करण्यात आले. या मुल्यमापन समितीमध्ये परिक्षक म्हणून पशूवैद्यकिय अधिकारी डॉ. रेपाळे, डॉ.शिंगणे, डॉ.मोरे, डॉ.बनकर इत्यादी होते. यांनी संकरीत गावरान गायींचे वय,आरोग्य,दूध देण्याची क्षमता इत्यादींच्या आधारे सदर मूल्यमापन केले.

गो पालक शेतकरी सन्मानित
संकरीत गावरान अशा दोन गटातून गायींच्या गोपालकांना बक्षिस वितरण करण्यात आले. संकरीत गटातून अशोक धोंडगे कंबरखेड देशी गटातून दामोधर गायकवाड बोरखेडी यांच्या गायीला प्रत्येकी एक पोते ढेप २५ लिटर कॅल्शियमची कॅन बक्षिस देण्यात आले. व्दितीय बक्षिस एकनाथ आव्हाळे सिध्देश्वर जवंजाळ यांच्या गायीला प्रत्येक पोते ढेप देण्यात आले.




संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा