उम्मीदों की कश्ती को डुबोया नही करते...मंजिल दूर हो तो थक कर रोया नही करते...रखते हैं जो दिल में उम्मीद कुछ पाने की,
वो लोग जिंदगी मे कुछ खोया नही करते...यशाची स्वप्ने उराशी बाळगून ध्येयाकडे मार्गक्रमण करण्याची तयारी करून त्या दिशेने सतत पावले टाकत यश प्राप्त करणे फार थोडया जणांना जमते. ग्रामीण भागातून कुस्तीसारख्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावणे ही तिवढे सोप काम नाही... मात्र येथील विवेकानंद विद्या मंदिराची इयत्ता दहावीत शिकणारी विद्यार्थीनी कु.संजिवनी निलेश हिवलेकर हीने हे सिध्द करून दाखविले आहे.
येथील कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विद्या मंदिराची विद्यार्थीनी कु.संजिवनी निलेश हिवलेकर हिने अमरावती जिल्हायातील परतवाडा येथे दि. 3 व
4 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेत कांस्यपद पटकावून महिला कुस्ती स्पर्धेत यश संपादन केले.
अमरावती जिल्हयातील परतवाडा येथे श्री हनुमान व्यायाम मंदिर आखाडा,अमरावती जिल्हा कुस्तीविर संघ व प्रहार संघटना यांनी विदर्भ केसरी कुस्ती दंगल स्पर्धा महिला व पुरूष गट कुस्ती स्पर्धेच आयोजन दि. 2,3 व 4 ऑगस्ट रोजी केले होते. या कुस्तीस्पर्धेत अनेक कुस्तीवीर मोठया संख्येने सहभागी झाले होते. येथील कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विद्या मंदिराची इयत्ता दहावीत शिकणारी कु. संजिवनी निलेश हिवलेकर ही 63 किलो वजन गटातून महिला कुस्तीस्पर्धेत तृतीय येवून तीन कांस्यपदक पटकावले. संजिवनी हिवलकर हीना आमदार बच्चु कडू यांच्या हस्ते प्रमाणप्रत्र,पदक देवून गौरविण्यात आले. कु.संजिवनी निलेश हिवलेकर हीच्या यशाबद्दल विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,
उपाध्यक्ष अशोक थोरहाते,
सचिव संतोष गोरे,
सहसचिव विष्णुपंत कुलवंत,
आत्मानंद थोरहाते,
विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर यांच्यासह प्राचार्य कैलास भिसडे,
उपप्राचार्य अशोक गि-हे,
पर्यवेक्षक आत्माराम जामकर,
देवेंद्र मोरे यांनी अभिनंदन केले. आहे.
संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा