हरिहरतीरर्थावरील निसर्गरम्य वातावरण श्रावण महिन्यामध्ये अधिकच खुलून जाते. राज्यभरातील हजारो पर्यटकांची पावले या हरिहर तीर्थक्षेत्राकडे वळू लागली आहेत. हरि व हर या दोन्हीमध्ये भेद नाही. म्हणून वैष्णव व शैवांना एकाच ठिकाणी भगवान बालाजी व भगवान शिवाचे दर्शन सुलभ घेता यावे,यासाठी कर्मयोगी संत प पू शुकदास महाराजांच्या संकल्पनेतून हरिहर तीर्थाची निर्मिती झाली. श्रावण महिना म्हटला की,व्रत,वैकल्य,अधिष्ठानाचा महिना...मनुष्याची मलिनता दूर होवून भक्तीव्दारे चैतन्याचा साक्षात्कार करणारा महिना,असे चित्र डोळयासमोर येते.
हरि व हराच्या दर्शनासाठी राज्यभरातून अलोट भक्तांची गर्दी श्रावण महिन्यामध्ये हरिहर तीर्थावर होते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हजारो पर्यटक,भाविक भक्त मोठया संख्येने हिवरा आश्रम येथील श्रीक्षेत्र हरिहर तीर्थ येथे भगवान शिव व भगवान बालाजीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. भल्या पहाटी निसर्गाच्या कुशीत जातांना युवा पिढीसह बच्चेकंपनीसुध्दा दंग होतात. श्रावणसरी बरल्याने हिरावा शालू परिधान केलेली वसुंधरा व नयनरम्य निसर्ग पाहण्याची अनुभूती काही औरच आहे. हरिहर तीर्थक्षेत्र भक्तांच्या श्रध्देचे अतूट स्थान आहे.हरिहर तीर्थक्षेत्र येथील भगवान शिव व भगवान बालाजी यांची भव्य मंदिरे आपले वेगळेपण जपत आहेत. रेखीव कलाकृती,आकर्षक रंगछटा,भिंतीवरील भगवान बालाजींची सचित्र कथा पाहून भाविकांचे मन प्रसन्न होते. मंदिराच्या प्रवेशव्दावर दिमाखात उभे असलेले सिंह बाल गोपांना आकर्षीत करून जातात.
शिव पावन धारे मध्ये स्नान केल्यानंतर समोर भगवान बालाजी मंदिरात जाणा-या रस्त्यावर सुबक आणि उंच अशी कमान आहे.भगवान बालाजी मंदिर कळपापर्यंत ८१ फूट उंच असून मंदिराचे बांधकाम हेंमाडपंथी पध्दतीचे आहे.भगवान बालाजीची मूर्ती १३ फुट उंच असून असे शिल्प अन्यत्र नाही. दर्शनासाठी येणा-या सर्व भाविकांना लाडूचा प्रसाद दिला जातो. शिव मंदिराच्या परकोटाच्या पाय-या चढून गेले की, सर्वप्रथम नजरेत पडते करस्थ गंगेची मूर्ती,गोमूखातून अविरत प्रवाहित होणारी पावनधारा आणि प्रशस्त गंगाकुंड.या पावन शिवधारेखाली स्नान करणा-यांच्या मनाची मलीनता दूर होते.विवेक जागृत होतो आणि भगवंताशी समिपता साधण्याची पात्रता भाविकांच्या अंगी येते.सोमवार,अमावस्या,शिवरात्री इत्यादी प्रसंगी येथे पावनधारेखाली स्नानासाठी व दर्शनासाठी रीघ लागते.
हरिहर तीर्थ वास्तूकलेचा अव्दितीय नमुचा
हरिहर तीर्थक्षेत्र येथील भगवान शिव व भगवान बालाजी यांची भव्य मंदिरे आपले वेगळेपण जपत आहेत. रेखीव कलाकृती,आकर्षक रंगछटा,भिंतीवरील भगवान बालाजींची सचित्र कथा पाहून भाविकांचे मन प्रसन्न होते. मंदिराच्या प्रवेशव्दावर दिमाखात उभे असलेले सिंह बाल गोपांना आकर्षीत करून जातात.
भगवान बालाजी मंदिर
शिव पावन धारे मध्ये स्नान केल्यानंतर समोर भगवान बालाजी मंदिरात जाणा-या रस्त्यावर सुबक आणि उंच अशी कमान आहे.भगवान बालाजी मंदिर कळपापर्यंत ८१ फूट उंच असून मंदिराचे बांधकाम हेंमाडपंथी पध्दतीचे आहे.भगवान बालाजीची मूर्ती १३ फुट उंच असून असे शिल्प अन्यत्र नाही. दर्शनासाठी येणा-या सर्व भाविकांना लाडूचा प्रसाद दिला जातो.
शिव जलाभिषेकाची दिव्य पावनधारा
शिव मंदिराच्या परकोटाच्या पाय-या चढून गेले की, सर्वप्रथम नजरेत पडते करस्थ गंगेची मूर्ती,गोमूखातून अविरत प्रवाहित होणारी पावनधारा आणि प्रशस्त गंगाकुंड.या पावन शिवधारेखाली स्नान करणा-यांच्या मनाची मलीनता दूर होते.विवेक जागृत होतो आणि भगवंताशी समिपता साधण्याची पात्रता भाविकांच्या अंगी येते.सोमवार,अमावस्या,शिवरात्री इत्यादी प्रसंगी येथे पावनधारेखाली स्नानासाठी व दर्शनासाठी रीघ लागते.
शैव व वैष्णव पंथाचा संगम असलेले देशातील पहिले तीर्थक्षेत्र
हरि व हर या दोन्हीमध्ये भेद नाही. म्हणून वैष्णव व शैवांना एकाच ठिकाणी भगवान बालाजी व भगवान शिवाचे दर्शन सुलभ घेता यावे,यासाठी कर्मयोगी संत प पू शुकदास महाराजांच्या संकल्पनेतून हरिहर तीर्थाची निर्मिती झाली.
संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा