पुन्हा जन्मुनी गात मरावे महाराष्ट्र गीत!




महाराष्ट्राच्या भूमीतील अव्वल दर्जाची लोककला म्हणून शाहिरी पोवांडयांना विशेष महत्व आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्रातील शाहिरांनी समाजामध्ये राष्ट्रभक्ती,राष्ट्रप्रेम व स्वराज्यप्राप्तीसाठी कायम प्रेरीत केले.स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंत लोककलावंत व शाहिर यांचे मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र्य संग्रमातील शाहिराचे योगदान मोलाचे असल्याचे विचार सांगली येथील शाहिर सम्राट देवानंद माळी यांनी नुकतेच सकाळच्या मुलाखती दरम्यान बोलतांना व्यक्त केले.शाहिर हा महाराष्ट्राचा प्राण असल्याचेही त्यांनी सांगीतले.यावेळी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सहसचिव आत्मानंद थोरहाते,सुप्रसिध्द तबलावादक संजय म्हस्के,शाहिर सज्जनसिंह राजपूत,विक्रांत राजपूत तथा आदि उपस्थित होते.

यावेळी शाहिर सम्राट देवानंद माळी म्हणाले की, महाराष्ट्रातील शाहिरांनी एका हातात डफ घेऊन परिस्थितीची कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता स्वातंत्र्यपूर्र्व काळापासून ते आजपर्यंत आपल्या शाहिरी कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात समाजामध्ये जनजागृतीचे अलौकीक कार्य केले आहे. शाहिरांनी आपल्या कार्यक्रमातून देशभक्ती, बंधुत्व आणि सामाजिक ऐक्याचाच प्रचार व प्रसाराचे कार्य केले. शाहिरांनी आपल्या कार्यक्रमातून महाराष्ट्राचा गौरवशाली व दैदिप्यमान इतिहास जनतेसमोर कार्यक्रमाच्या माध्यातून सादर करून समाजामध्ये नवचैतन्य जागृत करण्याचे काम केले. महाराष्ट्राचाच हाच गौरवशाली इतिहास आपल्या शाहिरी पोवाडयांच्या माध्यमातून सादर करण्याचे काम शाहिर सम्राट देवानंद माळी,पत्नी शाहिर चंद्रीकाकल्पना माळी,मुलगा बालशाहिर बालगंर्धव पृथ्वीराज अखंडपणे करीत आहेत. लोककला व शाहिरी ही खूप मोठी परंपरा आहे. कोणतीही कला आत्मसात करण्यासाठी मोठी तपश्चर्या करावी लागते. समर्पण व त्यागाने सर्व शक्य होते. शाहिरी करण्यासाठी जन्मजात प्रतिभाशक्तीसकस अभिनयकौशल्यलेखनशैलीस्मरणशक्तीभावपूर्ण सादरीकरणची कला यासारख्या गुणांची गरज असल्याचेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले.


शाहिरी कार्यक्रमांच्या माध्यमातून जागृती
शाहिर सम्राट देवानंद माळी हे आपल्या शाहिरी कार्यक्रमातून समाजजागृतीचे गेल्या तीन दशकांपासून मोठे कार्य करीत आहेत. आपल्या कार्यक्रमातून राष्ट्रप्रेम,देशभक्ती,व्यसनमुक्ती,हुंडाप्रथा,ग्रामस्वच्छता,कुपोषणमुक्ती,स्त्रीभ्रूणहत्या याबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करीत आहेत.

शाहिरांचे योगदान मोलाचे
भारत देश गुलामगिरीत असतांना महाराष्ट्रातील शाहिरांनी आपल्या पोवाडयांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात जनजागृती केली.आपल्या शाहिरी पोवाडयांच्या माध्यमातून जनतेच्या मनात राष्ट्रप्रेम,राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करून त्यांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रेरीत केले.


संतोष थोरहाते 
पत्रकार,दैनिक सकाळ तथा प्रेरणादायी व्याख्याता 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा