संशोधकवृत्ती,जिज्ञासा व ध्येयाप्रति एकनिष्ठता असेल तर काही शक्य होवू शकते याचाच प्रत्यय येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या दुस-या वर्षात शिकणा-या विद्यार्थींनींनी बनविलेल्या कीड
नियंत्रक यंत्र बनविले आहे. अकोला येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत दि.८ व ९ ऑक्टोंबर रोजी झालेल्या आविष्कार २०१८ मध्ये विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवरा आश्रम येथील विद्यार्थींनीच्या कीड
नियंत्रक यंत्राची राज्यस्तरीय आविष्कार २०१८-१९ साठी निवड झाली आहे.
हिवरा आश्रम सारख्या छोटयाशा खेडयातील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनींनी बनविलेल्या किड नियंत्रक यंत्राचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी जान्हवी डोसे,स्नेहा गवई,रूचा माळी,स्मिता मोरे या विद्यार्थीना प्रा.शिवशंकर काकडे,प्रा.पवन थोरहाते यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
दरवर्षी शेतक-यांचे माशी,मावा,तुडतुडे,फुलकिडे यापासून मोठया प्रमाणात नुकसान होते. ही बाब लक्षात घेवून विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी कीड
नियंत्रण यंत्राची टाकाऊ वस्तुपासून या यंत्राची निर्मिती केली आहे. कीड
नियंत्रण यंत्राच्या निर्मितीसाठी एक ते दीड हजार खर्च लागतो. या यत्रांच्या असलेल्या बल्बकडे रात्रीच्या वेळीस भरपूर प्रमाणात विविध पिकावरील पतंग,फुलपाखरे,हुमनी आळीचा प्रौढ आकर्षीत होवून रॉकेल मिश्रीत पाण्यात पडून मरण पावतात अशाप्रकारे कीड
चे मोठया प्रमाणात नियंत्रण होवून किटकनाशक फवारणीच्या खर्चात बचत होते. तसेच डब्याला दिलेल्या पिवळया व
निळया रंगाकडे आकर्षीत होवून चिकटून मरण पावतात.
असे आहे किड नियंत्रक यंत्र
चार बाय दोन फुट लोखंडी फ्रेम बनविली. या फ्रेमच्या मध्यभागी दोन बाय दोनच्या फ्रेम दोन बाजूंनी बेअरींग असलेल्या रॉडच्या मध्यभागी १५ लिटर तेलाचा रिकामा डब्बा बसविला आहे. या डब्याच्या दोन बाजूला पिवळा रंग तर दुस-या दोन बाजूला निळा रंग असून डब्यामध्ये एक हजार वॅटचा विद्युत बल्ब बसविला आहे. वा-याच्या
मदतीने सदर यंत्र फिरते.
महाराष्ट्रा मध्ये दरवर्षी साधारणपणे कीड
पासून मोठया प्रमाणात नुकसान होते. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनविले कीड
नियंत्रण यंत्र बळीराजासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.
प्रा.शिवशंकर काकडे विभागप्रमुख किटकशास्त्र
किड नियत्रंण यंत्राच्या मदतीने फुलकिडे,पतंगापासून ८० टक्के नियंत्रण होते तर मावा,तुडतुडे,हुमनी आळी यांच्यापासून ६० टक्के नियंत्रण होते. सदर यंत्र इको फ्रेंडली असून यंत्र निर्मितीसाठी अल्प खर्च लागतो
जान्हवी डोसे विद्यार्थीनी विवेकानंद कृषी महाविद्यालय
संतोष थोरहाते
संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा