Responsive Ads Here

मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८

जेष्ठांनी सामाजिक कार्यातुन आनंद शोधावा - संतोष गोरे



जेष्ठ नागरीकांच्या अनुभव,ज्ञानाचा कौशल्याचा भावी पिढीला नेहमी फायदा होत असतो. जेष्ठ  नागरीक हा कुटूंबाचा खरा आधार मार्गदर्शन आहे. लहान मुलांना सुसंस्कार शिस्त लावण्यात जेष्ठांची भूमी अत्यंत मालाची आहे. जेष्ठांनी सामाजिक कार्यातुन आनंद शोधावा असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी बोलतांना व्यक्त केले. विवेकानंद आश्रमात जेष्ठ नागरीक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात  सोमवारी ता. रोजी  ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दिप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले तर प्रमुख पाहूणे म्हणून उपाध्यक्ष अशोक थोरहाते,माजी उपाध्यक्ष .ना.धाडकर,विष्णु थुट्टे,आत्माराम जाधव,संजाबराव सवडतकर तथा आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांन गोरे म्हणाले की,जेष्ठांनी आपल्या फावल्यावेळेत आपल्या छंदाची जोपासना करावी. जेष्ठांनी वाढत्या वयोमानानुसार आपल्या आहारात सुध्दा बदल करावे. जेष्ठांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्याप्रमाणे औषधोपचार घ्यावा. संतुलीत आहार हा उत्तम आरोग्याचा एक भाग असल्यामुळे याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे असेही ते पुढे बोलतांना म्हणाले. यावेळी अध्यक्ष आर.बी.मालपाणी,विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर, काशिराम कोंडेकर, अर्जुनराव गारोळे, सुखदेव दळवी, गंगाधर निकस, ईश्वर मगर, सुभाष सवडतकर, मोतीराम थोरहाते यांच्यासह गावातील जेष्ठ नागरीक तथा महिला मोठया संख्येने उपस्थित होते. जेष्ठ नागरीक दिनानिमित्त जेष्ठांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जेष्ठांना यावेळी तपासणी करून मोफत औषधींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांनी तर आभार पुरूषोत्तम आकोटकर यांनी मानले.

जेष्ठांची आरोग्य तपासणी

कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षापासून विवेकानंद आश्रमात दरवर्षी जेष्ठ नागरीक दिनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुध्दा विवेकानंद आश्रमात जागतिक जेष्ठ नागरीक दिनानिमित्त जेष्ठ नागरीक महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी जेष्ठांना औषधींचे वाटप करण्यात आले.



संतोष थोरहाते 
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा