आपण सर्व एकाच देवाची लेकरे आहोत.पंथ,जात व धर्मापेक्षा सुध्दा माणुसकी धर्म हा महान आहे. ज्या प्रमाणे भिन्न भिन्न नदया अंतिम एकाच ठिकाची येऊन सागराला मिळतात त्याचप्रमाणे सर्व धर्मांचे अंतिम सत्य हे मानवधर्म आहे. हा दिव्य विचार नजरेसमोर ठेवत नवदुर्गा मंडळाने मुस्मिल दांपत्याच्या हस्ते दुर्गा मातेचे पुजन व आरतीचा मान देवून समाजाला मध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला. हिवरा आश्रम येथील नवदुर्गा उत्सव मंडाळाने प्रथमच मुस्लिम दांपत्याला दुर्गा मातेचे पूजन व आरतीचा मान दिला. महेमुद खाँ पठाण व सौ.खैरूण बी महेमुद खाँ पठाण या मुस्मिल दांपत्याने नवयुवक दुर्गा मंडळाच्या विनंतीला मान देत दुर्गा पुजन व आरती केली. हिवरा आश्रम सारख्या खेडयातून सामाजिक ऐक्यासाठी नवदुर्गा मंडळाने घेतलेल्या पुढाकाराचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. महेमुद खाँ पठाण हे हिवरा आश्रम येथील ग्रामपंचायत मध्ये शिपाई या पदावर कार्यरत आहे. हिवरा आश्रम येथील नवदुर्गा मंडळाने प्रथम मुस्लिम दाम्पत्याला पुजनाचा मान देवून आम्ही सर्व एक आहोत,एका देवाची लेकरे आहोत.जात,पंथ व धर्म जरी भिन्न असले तरी आमच्यातील माणूसकीच्या नात्याने आम्ही एकमेकांशी मैत्रीच्या,स्नेहाच्या व बंधुत्वाच्या धाग्याने एकत्रितपणे जोडले गेला आहोत. हिवरा आश्रम येथे सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदने नांदतात. यावेळी माजी सरपंच मनोहर गि-हे,सरपंच पती मुंगशीदेव डाखोरे,ग्रा.पं.सदस्य राज ठाकरे,संजय केंदळे,शेषराव काकडे,नवयुवक दुर्गा मंडळाचे अध्यक्ष संतोष कुसळकर,उपाध्यक्ष महादेव हुंबाड तथा गावतील महिला मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.
स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या सर्वधर्म परिषेदमध्ये विश्वबंधुत्वाचा संकल्पना प्रथम जगासमोर मांडली. स्वामी विवेकानंदांच्या दिव्य विचाराचा अंगिकार केल्यास समाजामध्ये शांती नांदेल.
हभप गजाननदादा शास्त्री महाराज
सामाजिक ऐक्य परिषदेतून मिळाली प्रेरणा
बुलडाणा जिल्हयाचे पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ यांनी हिवरा आश्रम येथे सामाजिक ऐक्य परिषद घेतली होती. या सामाजिक ऐक्य परिषदेमध्ये हभप गजानन दादा शास्त्री महाराज व कौमी एकता परिषदेचे शेख सलालुद्दीन यांच्या मार्गदर्शनापासून नवयुवक दुर्गा मंडळाने प्रेरणा घेवून सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविण्यासाठी मुस्लिम दांपत्याकडून दुर्गा मातेचे पुजन व आरती करून घेतली.
संतोष थोरहाते
संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा