Responsive Ads Here

शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१८

जागरूक मतदार लोकशाहीचा आधार- नायब तहसीलदार जायगुडे




भारतात जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून कल्याणकारी राज्य चालविले जाते. भारत हा जगातील सर्वात मोठा  लोकशाहीचा स्वीकार केलेला देश आहे. मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मतदाराने निर्भयपणे विचारपूर्वक मतदान करण्याची गरज असते. जागरूक मतदार लोकशाहीचा आधार असल्याचे विचार मेहकरच्या नायब तहसीलदार वैशाली जायगुडे यांनी बोलतांना काढले.
कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रिय सेवा योजना तहसील कार्यालय मेहकर यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजीत वक्तृत्व स्पर्धेच्या कार्यक्रम प्रसंगी गुरुवारी ता. ११ रोजी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य बी.डब्ल्यु.सावरकर,तर प्रमुख पाहूणे म्हणून नायब तहसीलदार वैशाली जायगुडे,आश्रमाचे सचिव संतोष गोरे तथा आदि उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभाग तहसील कार्यालय मेहकर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या वक्तृत्व स्पर्धेत राहुल ठेंग याचा प्रथम क्रमांक तर पल्लवी शिंगणे व्दितीय  तर चैताली देशमुख हिचा तृतीय क्रमांक आला. यावेळी रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी गजानन गायकवाड,रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा.गजानन ठाकरे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.पल्लवी मिटकरी,प्रा.मनोज मु -हेकर,प्रा.जयप्रकाश सोळंकी,प्रा.समता कस्तुरे, प्रा.योगेश काळे यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गजानन ठाकरे तर आभार प्रदर्शन कु.प्रणिता मगर हीने मानले.


संतोष थोरहाते 
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा