Responsive Ads Here

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

रक्तदान एक सामाजिक बांधिलकीचे कार्य- प्राचार्य डॉ.सावरकर




रक्तदान हे दान श्रेष्ट दान आहे. रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक ॠण फेडण्याची संधी मिळते. रक्तदान कोणत्याही जात,पंथ आणि धर्माच्या लोकांना एकत्रित जोडण्याचे अदभूत काम करते. रक्तदान एक सामाजिक बांधिलकीचे कार्य असल्याचे विचार विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.डब्ल्यू. सावरकर यांनी बोलतांना काढले.
कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आयोजित रक्तगट तपासणी कार्यक्रमी प्रसंगी सोमवारी ता. रोजी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन दिप प्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनाच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री या महापुरूषांच्या जयंतीचे औचित्य साधून विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी जीवनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांच्या मदतीने जवळपास ६० लाभार्थ्यांचे निशुल्क रक्तगटाची तपासणी करून दिली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी रक्तदानाचे महत्व गरज यासंदर्भात माहिती दिली. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी गजानन गायकवाड, महिला कार्यक्रम अधिकारी पल्लवी मिटकरी, प्रा.मनोज मु-हेकर, प्रा.जयप्रकाश सोळंकी, प्रा.किशोर गवई, प्रा.राम धमक, प्रा.पल्लवी रायमुलकर, प्रा.समता कस्तुरे, प्रा.गजानन ठाकरे, प्रा.प्रिया वायसे, प्रा.मनिषा कुडके तथा आदि उपस्थित होते.



रक्दाना संबंधी घोषवाक्य
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी रक्तदानाचे महत्व पटवून देण्यासाठी  जो रक्तदान करतो दुस-याच्या जीवनाचा दिवा लावतो,रक्तदान आहे खूप जरूरी त्याने नाही येत कमजोरी, आपले रक्त दान करा या जीवनाचे कल्याण करा स्वतःची ओळख बनवा,चला रक्त दान द्या, मानवतेच्या स्तरावरून हे जाहीर करा,वेळोवेळी रक्तदान करा अशी घोषवाक्यांनी रक्तदानाचे महत्व पटवून दिले.


रक्तदान एक श्रेष्ठ दान आहे. विवेकानंद विज्ञान महाविद्यालयातील रासेयो च्या विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या जयंती प्रसंगी आयोजित केलेले रक्तगट तपासणीचे कार्यक्रमाचे आयोजन खरोखरच स्तुत्य आहे.  रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक दायित्व पूर्ण करण्याची संधी मिळते. रक्तदान हे समाजहितैषी कार्य आहे.
                                               प्रा.पल्लवी मिटकरी,रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी


संतोष थोरहाते 
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा