कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराजश्री संस्थापित विवेकानंद आश्रमात १ जून ते २१ जून पर्यंत उन्हाळी संस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले. १ जून ला हभप निवृत्तीनाथ येवले शास्त्री महाराज यांचे हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. २१ दिवस चाललेल्या या शिबीरात गीत,
संगीत,
नाटय,
लेझीम,
कुस्ती,
मल्लखांब,
योगासने इत्यादीचे प्रशिक्षण देण्यात आले. सकाळी ५ वाजता योग प्राणायमाने शिबीराची सुरूवात होवून मल्लखांब,
कुस्ती,
लेझीम,
लाठीकाठी त्यानंतर संस्कार वर्गात गीतापाठ,
हनुमान चालिसा दुपारी इंग्लिश स्पिकिंग,कथाकथन व विविध कला अविष्काराची संधी सायंकाळी हरीपाठ व संस्कार वर्ग अशी संस्कार शिबीराची दिनचर्या होती. आज २१ जून योग दिनाचे औचित्य साधून या संस्कार शिबीराचा समारोप झाला. समारोपीय कार्यक्रम ६ वाजता सुरू झाला. यावेळी व्यासपीठावर योगप्राणायाम शिक्षक नानासाहेब इंगळे,
घनश्याम गोरे,
क्रिडा प्रशिक्षक विजय गोरे याची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. योग प्राणायामाचा वर्ग झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी लेझीम,मल्लखांब व कुस्तीचे चित्तथराक प्रयोग सादर केले. या शिबीरात सुमारे तीनशे मुले मुली सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी,विविध शैक्षणिक संस्थेचे प्राचार्य,शिक्षक,परीसरातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
या बालसंस्कार शिबीराला १ जून पासून प्रारंभ झाला असून २१ जून ला समारोप करण्यात येणार आहे. या बालसंस्कार शिबीरात विद्यार्थ्यांसाठी योगासने,मंत्रोच्चार,संस्कृत सुभाषिते,इंग्रजी संभाषण,बौध्दिक क्षमता विकास,चर्चा सत्र,मनोरंजक खेळ, प्रार्थना, हरीपाठ,
गीतापाठ,
मल्लखांब,
पाऊली,
स्टेज डेअरींग,
संगणक प्रोजेक्टर व्दारे प्रेझेंटेशन,
हस्ताक्षर सुधार प्रकल्प,अशा विविध उपक्रम राबविण्यात आले होते.
सुप्तकलागुणांना मिळाली संधी
विद्यार्थ्यांच्या आतील सुप्तकलागुणांना संधी मिळण्यासाठी या बालसंस्कार शिबीराचा मोठा फायदा होतो. प्रथमच या शिबीरामुळे लहान मुले मोबाईल व व्हीडीओ गेमच्या विश्वातून बाहेर पडून मैदानावर कुस्ती,
मल्लखांब,
कवायती,
कथाकथन,
अभिनय कौशल्य,
लेझीम,
कसरत
,योगासने करतांना दिसत आहे.
शिबिराचा ३०० शिबिरार्थींना लाभ
विवेकानंद आश्रमाने दि. १ जून ते २१ जून पर्यंन्त आयोजित केलेल्या बालसंस्कार शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबीरात सुमारे तीनशे मुले मुली सहभागी झाले होते. शिबीरामुळे विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण झाली आहे.
कर्मयोगी संत प पू शुकदास महाराजांच्या सानिध्याने पावन झालेल्या विवेकानंद आश्रम घेण्यात आलेल्या २१ दिवसीय बालसंस्कार शिबिराचा शिबिरार्थींना त्यांच्या भविष्यासाठी खूप फायदा होणार आहे. मुलांच्या हातातून मोबाईल काढून घ्यायचे असतील तर मुलांना मैदानावर पाठवावे लागेल. त्यांना खेळासारखे इतर पर्याय निर्माण करावे लागतील. उन्हाळयाच्या सुट्टीमध्ये हे संस्कार शिबीर अत्यंत उपयुक्त ठरले आहे.
एकनाथ आव्हाळे,पालक,हिवरा आश्रम
एकनाथ आव्हाळे,पालक,हिवरा आश्रम
संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
श्रीनिवास विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा