Responsive Ads Here

गुरुवार, १३ जून, २०१९

देऊळगांव माळी येथे बळीराजासाठी इन्फॉर्मेशन कॉर्नर


शेतकरी बांधवांसाठी आधुनिक शेती संबंधी माहिती,शेतकरी यशोगाथा,शेतीपुरक व्यवसाय माहिती,किड व्यवस्थापन,पाणी व्यवस्थान,बागायती शेती,पशुपालन,फळबाग लागवड यासंबंधी शेतक-यासाठी माहिती होण्याच्या दृष्टीने विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या कृषी उन्नती ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत देऊळगांव माळी येथे परिसरातील बळीराजासाठी इन्फॉर्मेेशन कॉर्नर सुरू केले आहे. यावेळी उपसरपंच विनोद फडके,पो.पा.गजानन चाळगे,समाधान मगर,राजेश मगर यांचे सह परिसरातील शेकडो शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशातील नागरीक शेती शेतीशी संबंधी रोजगारावर अवलंबून आहे. शेतक-यांनी आपल्या चाकोरीच्या बाहेर पडून शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीची उत्पादकता उत्पन्न वाढण्यासाठी करावा. कृषी फलकामुळे शेतक-यांनी बियाणे विकत घेतांना कोणती काळजी घ्यायची,बियाणाचे प्रकार,बियाण्याची बुरशी नाशकांसोबत बीजप्रक्रिया कशी करावी,बीज उगवण क्षमता करण्याची पध्दती,पेरणीपुर्वी बिण्याची साठवण करण्याची पध्दती इत्यादीची माहिती शेतकरी बांधवांना होणार आहे. शेतीच्या समृध्दीसाठी आनुनिक पीक घेण्याच्या पध्दतीमुळे पिकाचे उत्पन्न कमी येते म्हणून शेतक-यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होते. देशातील साक्षर पीढी शेती व्यवसायात उतरत आहे. त्यामुळे शेतीमध्ये विविध प्रयोग करून शेतीचे उत्पन्नात वाढ होत आहे. शेतीमध्ये झालेले संशोधन शेतक-यांनी अवलंब केलेले संशोधन आणि नवनवीन तंत्रज्ञान या गोष्टींमुळे शेतीचा विकास होईल.

शेतक-यांसाठी उपयुक्त ठरणार उपक्रम
भारत हा कृषि प्रधान  देश आहे. देशातील जवळपास ८० टक्के जनतेच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती शेतीशी संबंधी रोजगार आहे. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञांनाची माहिती नसते त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करतो मात्र विवेकानंद कृषि महाविद्यालयाच्या कृषि उन्नती ग्रुप च्या विद्यार्थ्यानी सुरू केलेल्या इन्फॉर्मेशन कॉर्नर चा परिसरातील शेतकरी बांधवांना मोठा फायदा होणार आहे

कृषी फलकावर मिळणार अद्यावत कृषी माहिती
कृषी फलकामुळे शेतक-यांनी बियाणे विकत घेतांना कोणती काळजी घ्यायची,बियाणाचे प्रकार,बियाण्याची बुरशी नाशकांसोबत बीजप्रक्रिया कशी करावी,बीज उगवण क्षमता करण्याची पध्दती,पेरणीपुर्वी बिण्याची साठवण करण्याची पध्दती इत्यादीची माहिती शेतकरी बांधवांना होणार आहे.

प्राचार्य,प्राध्यापक वृंदांचे मार्गदर्शन.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी उन्नती ग्रुपमध्ये महेश आखरे, ओम राऊत, गोपालसिंग राजपूत, सागर जावळे, शिवा महेश, भानुप्रकाश कृषी उन्नती ग्रुपच्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे, प्रा.मनोज खोडके यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
  
शेतकरी बांधवांसाठी इन्फॉर्मेशन कॉर्नर ही नवीन कल्पना असून यामाध्यमातून शेतकरी बांधवांच्या ज्ञानात भर पडणार आहे. शेतकरी बांधवांसाठी इन्फॉर्मेशन कॉर्नर अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. शेतकरी बांधवांना या फलकाच्या माध्यमातून विविध उपयुक्त माहिती देण्याची व्यवस्था विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी उन्नती ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय


संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
श्रीनिवास विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा