प्रयोगशीलतेतून वैद्यकिय अधिका-यांने फुलविली शेती



काळया धरणी मातेशी जोडलेली नाळ कायम ठेवीत मेहकर तालुक्यातील देऊळगांव माळी येथील व्यवसायाने डॉक्टर असलेल्या वैद्यकिय अधिकारी डॉ.गजानन जयराम गि-हे यांनी नोकरी संभाळत प्रयोगशील शेती करत शेतीतून भरघोस उत्पन्न घेतले. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या कृषी संशोधन व शेतीतील विविध प्रयोगशीलतेमुळे त्यांनी ग्रामीण रूग्णालय मंगळरूळ पीर येथील रा.बा.स्वा.का.च्या वैद्यकिय अधिकारी पदाचा राजीनामा देवून विवेकानंद आश्रमात वैद्यकिय अधिकारी म्हणून रजू झाले. कर्मयोगी शुकदास महाराजांनी शेतकरी बांधवांना सेंद्रीय शेती,जैविक शेती व रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून शेती करण्याचा सल्ला दिला होता. डॉ.गजानन गि-हे यांनी आपल्या शेतात सेंद्रीय व जैविक पध्दतीने शेती करून हळद,कोथींबीर,दोडका अशा विविध पिके घेत असून ठिबक  व तुषार सिंचनाच्या  मदतीने तीन ते साडे तीन लाखाचे  उत्पन्न घेतले. त्यांनी हळद लागवड करण्यापूर्वी एक एकर शेतात शेणखत टाकले. बेड पध्दतीने सेलम जातीच्या हळद पिकाची लागवड केली. एक एकर शेतातून २५ ते ३० क्विंटल तयार हळदीचे उत्पन्न झाले .त्यांना एक ते दीड लाखाचे उत्पन्न झाले. डॉ गजानन गि-हे यांनी एक एकर शेतात दोडका वेलवर्गीय पिकाची लागवड  करून बेड वर चार बाय तीन फुटावर दोडका पिकाची लागवड केली. त्यांनी  ठिबक सिंचनाद्वारे कमी पाण्यामध्ये रासायनिक खते व किड नाशकांचा वापर कमी करून डिकंपोजरचा वापर केला. त्यांनी दोडका पिकामध्ये अंतरपीक पिक म्हणून कोथिंबीर पिकाची लागवड केली. सध्या चार ते पाच कॅरेट दोडका एक दिवस आड निघतो. पुढे दहा कॅरेट पर्यंत दोडका निघेले. आतापर्यंत ६० हजाराचे उत्पन्न झाले असून असाच भाव राहिल्यास  दोन लाखाचे उत्पन्न मिळेले. दोडका अंतरपीकात सात ते आठ क्विंटल कोथिंबीर काढली निघाली आहे.

ठिबक व तुषार सिंचनाचा वापर
डॉ.गजानन गि-हे यांनी नोकरी सांभाळून शेती करण्याच्या निर्णय घेतला. शेतीसाठी ठिबक व तुषार सिंचनाच्या माध्यमातून कमीत कमी पाण्यामध्ये ते विविध पिके घेत आहे.

काय ओ रेसिड्यु फ्री भाजीपाला
रासायनिक किटक नाशक व खतांचा वापर टाकून त्याऐवजी जेंव्हा सेंद्रिय खते व जैविक किडक नाशकांची फवारणी करून उत्पादीत केलेल्या केमिकल्स विरहीत भाजीपाल्याला रसिड्यु फ्री भाजीपाला म्हणतात.

सेंद्रीय खते व जैविक किडनाशकांची फवारणी करून उत्पादीत केलेला रेसिड्यु फ्री भाजीपाला ग्राहकांना देण्याचा मानस असल्यामुळे नोकरी सांभाळून शेती केली.
डॉ.गजानन गि-हे प्रयोगशील शेतकरी

संतोष थोरहाते
श्रीनिवास विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८                  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा