Responsive Ads Here

मंगळवार, ११ जून, २०१९

शुकदास महाराजांच्या विचारांना कृती आणा- शिक्षणाधिकारी डॉ. पानझाडे




कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी स्वामी विवेकानंद अभिप्रेत असलेला चारित्र्यसंपन्न तरूण निर्मिती करण्यासाठी विवेकानंद विद्या मंदिर सुरू केले. कडक शिस्तीच्या वातावरणात मानवी मूल्यांची जोपणूक करणारी तरूण पिढी विवेकानंद विद्या मंदिरातून दरवर्षी बाहेर पडत आहे. प.पू. शुकदास महाराज माणूस घडविण्याचे काम केले. शुकदास महाराजांच्या विचारांना कृतीत आणु असे विचार शिक्षणाधिकारी डॉ.श्रीराम पानझाडे यांनी बोलतांना व्यक्त केले.
विवेकानंद आश्रमाच्या हरीहर तीर्थक्षेत्रावर आयोजित विवेकानंद विद्या मंदिराच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमलेन कार्यक्रम प्रसंगी रविवारी ता.९ रोजी ते बोलत होते. विवेकानंद आश्रमात दि. ९ जून रोजी आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. गेल्या अनेक दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप,फेसबुक इत्यादी माध्यमातून संपर्कात असलेल्या विद्यार्थ्यांची कार्यक्रमांच्या दरम्यान प्रत्यक्ष भेट झाली. जून्या आठवणींनी उजाळा मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.श्रीराम पानझाडे, प्रमुख विवेकानंद आश्रमाचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले,अध्यक्ष आर.बी.मानघाले,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,माजी प्राचार्य ज्ञानेश्वर वानखेडे, ,प्रा.उमेश करोडदे,प्रल्हाद भुसारी,निवृत्ती शिंदे, ज्ञानेश्वर  ब्राम्हणकर,पी.के.देशमुख,विष्णु थुट्टे,प्रमोद रायमूलकर, ईश्वर मगर,पत्रकार सिध्देश्वर पवार,जगन्नाथ जवंजाळ तथा आदि उपस्थित होते.
ग्रामीण भागातील होतकरू,हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणांची संधी उपलब्ध होण्यासाठी कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांनी १९८२ रोजी विवेकानंद विद्या मंदिराची सुरूवात केले. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी विवेकानंद विद्या मंदिरात प्रवेश घेतात. विवेकानंद आश्रमाने विवेकानंद विद्या मंदिरातून प्रवेश घेवू बाहेर पडलेल्याविद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी मेळावाचे आयोजन केले होते. या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी  हजारो विद्यार्थी विवेकानंद आश्रमात एकत्रित आल्यामुळे

माजी विद्यार्थ्यांनी विवेकानंद आश्रम फुलून गेला.
कर्मयोगी संत प. पू शुकदास महाराजश्रींनी ग्रामीण भागातील होतकरू,हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. ग्रामीण भागातील विद्याथ्र्याला शिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी 1982 मध्ये विवेकानंद वि़द्या मंदिर सुरू केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण,नीतीमूल्यांची जोपणूक,आदर्श व्यक्तीमत्वासाठी पोषक वातावरण,कडक शिस्त व समर्पितक शिक्षकवृृंद यामुळे लवकरच विवेकानंद वि़़़द्या मंदिराची ख्याती राज्यभर झाली. महाराष्ट राज्याच्या कान्याकोपयातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी विवेकानंद विद्या मंदिरात येवू लागले. आजतागायत हजारो विद्यार्थी शिक्षण घेवून बाहेर पडले आहे. विवेकानंद आश्रमाने माजी विद्याथ्र्यांना पुन्हा माजी मेळाव्याच्या निमीत्ताने पुन्हा एकत्र आणले. विवेकानंद आश्रमाच्या हरीहर तीर्थावर माजी मेळाव्यासाठी हजारो विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्याथ्र्यांनी हरिहरतीर्थ फुलून गेले.

गुरू शिष्य ऋणानुबंधाचे अदभूत दर्शन
विवेकानंद आश्रमाने आयोजीत केलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या कान्याकोपयातून विद्यार्थी मोळया संख्येने उपस्थित झाले. डोळयाची पारणे फेडणारा हा माजी विद्यार्थी मेळावा न भूतो न भविष्यती असा झाला.या मेळाव्यात सेवानिवृत्त झालेले शिक्षक व माजी विद्यार्थी भेटीने गुरू शिष्य ऋणानुबंधाचे अदभूत दर्शन घडले.
  
पर्यावरण संवर्धनाचा संदेश
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी ओसाड माळरानावर नंदनवन निर्माण केले. विवेकानंद आश्रमाच्या चहूबाजूंनी विविध वृक्षवेलींची लागवड केली. शुकदास महाराजांचा पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा वसा विवेकानंद आश्रमाने माजी विद्यार्थ्यांना दीड हजार वृक्षांचे रोपटे वाटप करून पुढे चालू ठेवला.

कर्तृत्वान विद्यार्थ्यांचा सत्कार
विवेकानंद आश्रमाच्या विद्या मंदिरातून शिक्षण  घेवून समाजामध्ये आपले कर्तृत्व सिध्द करण्या-या माजी विद्यार्थ्यांचा यावेळी विवेकानंद आश्रमाच्या वतीने स्मृती चिन्ह व रोपटे  भेट देऊन  सत्कार करण्यात आला. यामध्ये जि.प.सदस्य संजय वडतकर,प्रदीप जवंजाळगजानन वानखेडेप्रदिप भवसारअमोल चिद्रवारकेशव इकडेसंदीप जवंजाळराजेश पडघानराजेंद्र आव्हाळेलक्ष्मण ठेंगळे अशा विद्यार्थ्यांचा यावेळी रोपटे व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.


संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
श्रीनिवास विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा