मानवी जीवन हे पर्यावरणाचा असमतोल, वाढते तापमान, निसर्गाचा लहरीपणा यामुळे अनिश्चितेच्या सावटा खाली आहे. कृषीच्या शाश्वत विकासासाठी व मानवी जीवनसंवर्धनासाठी वृक्षसंगोपन हा एकमेव २ पर्याय हाती असल्याचे प्रतिपादन मेहकरचे तहसिलदार डॉ. संजय गरकल यांनी बोलतांना काढले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या कृषी विधाता व जय जीजाऊ ग्रुपच्या वतीने विवेकानंद आश्रमात आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते सोमवार ता.१ जून रोजी बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक,स्वामी विवेकानंद, कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे हे होते तर प्रमुख पाहूणे सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते,मंडळ कृषी अधिकारी अमोल अभंग, कृषी पर्यवेक्षक सुधाकर कंकाळ तथा आदि उपस्थित होते.
गेल्या काही वर्षात वृक्षतोडीच्या प्रमाणात झपाटयाने वाढ होत असून त्याचा परिणाम जनसामान्यांवर होत आहे. वृक्ष संवर्धनाचे महत्व वेळोवेळी संतानी सुध्दा सांगीतले आहे. वृक्ष लागवडीसाठी प्रत्येकाने पुढाकारी घेण्याची गरज आहे. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी असे यावेळी बोलतांना सचिव संतोष गोरे यांनी सांगीतले. यावेळी कृषी विधाता,जय जिजाऊ ग्रुपच्या विद्यार्थीनी स्नेहल घुने,शिवगंगा मिसाळ,कांचन सिरसाट,नितु जुनघरे,काजोल पाटील,निकीता होणे,प्रज्ञा बागडे,जूही पश्चाके,भावना सरोदे,वैष्णवी बोर्डे,योगीता राठोड,अश्विनी इंगळे, अश्विनी घुगे,आरती उइके, हर्षा पवार,सलोनी लड्डा,भारती नंदापुरे,दिपाली गि-हे,माधवी वाका,मानसा पोलरू विद्यार्थी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्नेहल घुगे व शिवगंगा मिसाळ यांनी तर आभार प्रदर्शन कांचन सिरसाट हीने मानले.
विद्यार्थीनींच्या
वृक्ष दिंडीतून प्रबोधन
यावेळी विवेकानंद
कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थीनींनी वृक्ष संवर्धनाचे महत्व
नागरीकांच्या मनावर बिंबविण्यासाठी हिवरा
आश्रम गावातून वृक्ष दिंडी काढून प्रबोधन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी झाडे लावा
झाडे जगवा अशा विविध पर्यावरण संवर्धनाच्या घोषवाक्यांनी आसमंत निनादून गेला.
पर्यावरण
संवर्धनाच्या घोषवाक्यांनी आसमंत निनादला
विवेकानंद कृषी
महाविद्यालयातील कृषी विधाता व जय जीजाऊ गु्रपच्या विद्यार्थीनींनी काढलेल्या
वृक्ष दिंडीतून पर्यावरण संवर्धन व वृक्ष रोपनाचे महत्व पटवून देण्यासाठी यावेळी
विद्यार्थीनींनी झाडांना घाला पाणी,ते
वाढवतील पाऊस पाणी,गाव किंवा शहर,असावा
वृक्षलागवडीवर भर...अंगणी लावा एकच तुळस, प्राणवायूचा होई
कळस...स्वच्छ जल,वायु,मृदा,वसुंधरेची खरी संपदा...जर असेल वृक्षाच्छादित,श्वासोच्छ्वास
राहील अबाधित...रोपे वाढतील, प्रदुषके काढतील...रोपवाटिका
करा, रोपे दान करा...प्रत्येकाचा कटाक्ष असावा,वृक्ष एकतरी जपावा...क्षारोपणात सहकार्य करा, निसर्ग
निरोगी ठेवा... अशी वृक्षरोपणाचे व पर्यावरण संवर्धनाचे महत्व सांगणा-या घोषवाक्यांनी यावेळी आसमंत निनादून गेला.
कृषीकन्यांनी
घेतला वृक्षरोपनासाठी पुढाकार
कृषी दिनाचे
औचित्य साधून विवेकानंद कृषी महाविद्यालयातील कृषी विधाता व जय जीजाऊ ग्रुपच्या
विद्यार्थीनींनी पुढाकार घेवून कॅफेटेरीयात वृक्ष रोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन
केले. यावेळी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,प्राचार्य डॉ.सुभाष कालवे यांच्या हस्ते वृक्षांचे रोपन करण्यात आले.
यावेळी डॉ.संजय धाडकर, प्रा.गजानन ठाकरे, प्रा.शिवशंकर काकडे, प्रा.मनोज खोडके, प्रा.मंगेश जकाते, प्रा.डॉ.भानुदास भोंडे, प्रा.राहुल साळवे, प्रा.दिपक निकम, प्रा.पवन थोरहाते, प्रा. रवींद्र काकड, प्रा. रवींद्र काळे,
प्रा.मिनाक्षी कडू, प्रा.सायली जाधव आदी
उपस्थित होते.
संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा