हंगामात फळाची बाजारेपठेत आवक वाढल्याने मातीमोल किंमतीला फळाची विक्री होते. त्यामुळे शेतक-यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. यावर उपाय म्हणून कृषी मालावर प्रक्रिया करून त्याची विक्री केल्यास बाजारपेठेत चांगली किंमत मिळते. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार मिळण्याच्या दृष्टीने येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या कृषी संवादिनी ग्रुपच्या विद्यार्थीनींनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत ग्राम पिंपळगाव उंडा येथील महिलांना फळ प्रकिया प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ज्योती रहाटे ,सविता
काळे,सरस्वती काळे,मालती काळे,मंगला काळे,प्रतिक्षा काळे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी संवादिनी ग्रुपच्या वतीने आयोजित फळ प्रकिया प्रशिक्षण शिबीराला महिलांकडेन चांगलाच प्रतिसाद मिळाला. फळ प्रक्रिया प्रशिक्षण शिबीरामध्ये महिलांना विविध फळाची मूल्यवर्धित उत्पादने बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कृषी संवादिनी ग्रुपमध्ये साक्षी दुतोंडे,मनिषा सोनुने,रूपाली गवई,दिक्षा भगत,शुभांगी मापारी,स्वाती उबरहांडे,श्वेता बोर्डे,निकीता खपके यांचा समावेश आहे.विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी संवादिनी ग्रुपच्या विद्यार्थिनींना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,प्रा.मनोज खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहेत.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनींनी आयोजित फळ प्रक्रिया प्रशिक्षणाचा पिंपळगाव उंडा येथील महिलांनी लाभ घेतला. या रोजगाराभिमुख प्रशिक्षणामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे.
डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या कृषी संवादिनी ग्रुपच्या विद्यार्थीनींनी कृषी फळ प्रक्रिया प्रशिक्षणातून आम्हाला विविध फळापासून घरच्या घरी कमी भांडवलामध्ये तयार करून स्वयंरोजगार कसा निर्माण करावा याचे प्रशिक्षण दिले.
सविता काळे, पिंपळगाव उंडा
पिंपळगांव उंडा या गावातील महिलांना स्वयंरोजगाराचे धडे मिळण्याच्या हेतूने आम्ही कृषी संवादिनी ग्रुपच्या वतीने फळ प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन केले. ग्रामीण भागातील महिलांना फळ प्रक्रिया करून मूल्य कसे वाढवता येते हे प्रशिक्षणा दम्यान शिकविण्यात आले.
शुभांगी मापारी,
विद्यार्थीनी विवेकानंद कृषी महाविद्यालय
ग्रामीण महिलांना
मिळाले रोजगाराभिमुख
प्रशिक्षण
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी संवादिनी गु्रपच्या विद्यार्थीनींनी आयोजीत केलेल्या फळ प्रक्रिया प्रशिक्षणाचा मेहकर तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील महिलांनी लाभ घेतला. ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराभिमुख फळ प्रक्रिया प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील महिलांना या प्रशिक्षणाचा खूप लाभ झाला असून प्रशिक्षणामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे.
संतोष थोरहाते
संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा