महिलांनी आपल्या कर्तृत्वाने प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. याचा प्रत्यय सर्पसखी वनिता बोराडे यांच्याकडे पाहल्यानंतर येतो. सर्वसामान्याच्या मनात सापा विषयीची कमीची धास्ती व भिती आहे. मात्र सर्पसखी वनिता बोराडे यांनी आतापर्यंत जवळपास ५१ हजार साप पकडून त्यांना जंगलात सोडून जीवनदान दिले आहे. नुकतचे सर्पसखी वनिता बोराडे यांनी दोन दिवसात मेहकर तालुक्यातील गाव,शेतातून अडोतीस साप पकत नवा विक्रम केला आहे. यामध्ये मेहकर येथील प्रशांत सावजी यांच्या फार्म हाऊसमधून एकाच दिवशी एकोणीस साप पकडले. दरवर्षी राज्यात जवळपास चोवीस हजार चारशे तीस लोक सर्पदंशामुळे मृत्यूमुखी पडतात. सर्पसखी वनिता बोराडे दरवर्षी सापांना पकडत असल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. या सर्व नाग विषारी प्रजातीचे असूनवनपरिक्षेत्र अधिका-यांना कळवून जंगलात सोडून दिले आहेत. पस्तीस वर्षापासून वनिता बोराडे या सर्पसंवर्धन व सर्प जागृतीच्या क्षेत्रात मोलाचे कार्य करीत आहेत. सर्पमित्र वनिता बोराडे सर्पदंक्ष व प्राथमिक उपचार याबाबत जिल्हात मोठया प्रमाणात जनजागृतीचे काम करीत आहे. आतापर्यंत जवळपास ५० हजार सापांना पकडून जीवनदान दिल्याची माहिती दैनिक सकाळशी बोलतांना मंगळवारी(दि.१०) सांगीतले.
विषारी साप पकडण्यात निपुण
सर्पमित्र वनिता बोराडे यांनी ग्रामीण व शहरी भागातून आतापर्यंत अत्यंत जहाल विषारी असणा-या मण्यार,घोणस,फुरसे,नाग जीवित्वाचा धोका पत्कारून पकडले आहे. विशेष बाब म्हणजे त्यांना एकदाही सर्पदंश झाला नाही.त्यांची साप पकडण्याची पद्धती अत्यंत सुरक्षित आहे.
साप पकडण्यासाठी निशुल्क सेवा
परिसरात कुठेही साप निघाला असता नागरीक त्यांना दुरध्वनीवरून संपर्क करतात. साप पकडण्यासाठी त्या वेळचे बंधन पाळत नाही. साप पकडण्यासाठी निशुल्क अहोरात्र सेवा देतात. सापांना व लोकांना जीवनदान देण्याचे हे सेवाकार्य आहे.
साप हा अन्नसाखळीतील महत्वाचा घटक असून लोक भितीपोटी सापाला मारतात. साप पर्यावरणाच्या संतुलनासाठी महत्वपूर्ण घटक आहे. साप उंदीर नियंत्रणासाठी महत्वाची भूमिका बजावतात. शेतक-याची मोठी मदत करतात. साप निघल्यास सर्पमित्रांची मदत घेवून वनविभागामार्फत जंगलात सोडून द्यावा.
लेखक
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा