Responsive Ads Here

शुक्रवार, ६ एप्रिल, २०१८

सोशल मिडीया ठरला सुशीलसाठी अर्थदुत


आजच्या काळात सोशल मिडीया प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य अंग बनला आहे. सुखाचे आनंदी क्षण व्यक्त करण्याचे ते प्रभावी माध्यम आहे. मंनोरजनासोबत सोशल मिडीयाचा  सामाजिक कार्यासाठी विधायक वापर समाजातील नागरीक वेळोवेळी करीत असतात.
 व्हॉटअ‍ॅप,फेसबुक,इंस्टाग्राम हे आभासी जग जरी असले तरी सामाजिक दायीत्व पूर्ण करण्याचे सुध्दा ते प्रभावी माध्यम असल्याचा प्रत्यय नुकताच हिवरा आश्रम येथील आजारी माजी विद्यार्थी सुशील हनुमान ठोसरे च्या उपचारासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी उभा केलेल्या आर्थिक निधीतून समोर आला आहे.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालीत विवेकानंद कृषी महाविद्यालयाचा के.के.सिरीजचा माजी विद्यार्थी सुशिल हनुमान ठोसरे वय २३ रा.पिंपळगाव सोनार हा काही दिवसापूर्वी ताप येत असल्यामुळे चिखली येथील एका खाजगी रूग्णालयात भरती झाला होता. मात्र ताप कमी होत न झाल्यामुळे डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला औरंगाबाद येथील सेठ नंदलाल धुत हॉस्पिटल येथे रेफर केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी सुशिलची तपासणी केल्यानंतर त्याच्या लिव्हरवर सुज असल्याचे निदान झाले. मात्र ब्लड प्रेशर सतत कमी होत असल्यामुळे डॉक्टरांनी पुढील तपासणीत त्यांचा वाल खराब झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. विवेकानंद कृषी महाविद्यालयाचा के.के.सिरीजचा विद्यार्थी सुशिल हनुमान ठोसरे याच्या उपचारासाठी आर्थीक मदतीचे आवाहन करणारी पोस्ट विवेकानंद आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट करता क्षणी समाजातील दानशूर व्यक्तींचे   मदतीचे अनेक हात पुढे आले. तसेच विवेकानंद आश्रमाच्या विविध शैक्षणिक संस्थातील प्राध्यापक,शिक्षक व कर्मचारी बांधवांनी सुध्दा सुशिलच्या पुढील उपचारासाठी मदत दिली. आतापर्यंत सुशिलच्या पुढील उपचारासाठी जवळपास ९० हजार रूपये त्यांच्या पुढील उपचारासाठी खात्यामध्ये जमा केले आहे. व्हॉटअ‍ॅपच्या याच आभासी दुनियेच्या माध्यमातून सुध्दा मोठे सामाजिक कार्य होवू शकते याचा प्रत्यय नुकताच हिवरा आश्रम येथील तरूणाच्या सोशल मिडीयाच्या विधायक वापरातून समोर आला आहे.

मदतीसाठी सरसावले मित्र
सोशल मिदियार सुशीलच्या आजाराची माहिती मिळताक्षणीच विवेकानंद कृषी महाविद्यालयात आतापर्यंत शिक्षण घेतलेल्या सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनी सुशीलच्या पुढील वैद्यकीय उपचारासाठी आपापल्या परीने आर्धिक मदत केली आहे. या सर्व मित्रांनी आतापर्यंत दोन लाखाहून अधिक रक्कम गोळा केली आहे.

सुशीलला आर्थिक मदतीची गरज
सध्या सुशिल बंगलोर येथील नारायणम हॉस्पिटल मध्ये भरती असून त्याच्या पुढील वैद्यकीय उपचार सुरू आहे. अजून सुध्दा सुशिलला आर्थीक मदतीची गरज आहे. सुशीलला पुढील उपचारासाठी आर्थीक मदत करण्यासाठी अकाउंट नंबर 31501152228 IFSC No SBIN 0003954  रक्कम जमा करू शकता.

सुशीलच्या घरची परिस्थिती हालाकीची असून पुढील उपचार करण्यासाठी कुठलेही त्याचे जवळ  आर्थिक पाठबळ नाही. सुशीलच्या पुढील उपचारासाठी समाजातील दानशुरांनी आर्थिक मदत करावी.
                                             आत्मानंद थोरहाते,सहसचिव विवेकानंद आश्रम.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा