Responsive Ads Here

रविवार, ८ एप्रिल, २०१८

"ग्रेट भेट" 
लहानपणापासून असलेली लिखाणाची कायम अभिरुची, उर्मी... अकोल्यातील महाविद्यालयीन काळापासून स्तंभलेख लिखाणापासून झालेली सुरुवात कधी पत्रकारितेत परिवर्तीत झाली हे कळलेच सुद्धा नाही. 
दैनिक सकाळने प्रथमच माझ्या सारख्या व्यक्तीला संधी दिली हे माझे परम भाग्यच म्हणावे लागेल. दैनिक सकाळचे बुलडाणा प्रतिनिधी अरुणजी जैन,उपसंपादक आशीष ठाकरे,योगेश देऊळकार साहेबांनी टाकलेला विश्वास दोन वर्षात पत्रकारितेच्या मध्यमातून खरा करून दाखविल्याचा मला सार्थ अभिमानही वाटतो. कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसतांना सुद्धा तुमच्या सारखे स्नेहीजन,हितचिंतक,मित्र व मार्गदर्शकांमुळेच मला पत्रकारितेच्या क्षेत्रात यशस्वीपणे झेप व मार्गक्रमण करता आले. दैनिक सकाळने सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळू शकलो.
विदर्भ सकाळचे कार्यकारी संपादक मा.शैलेशजी पांडे यांच्याशी जवळून भेटीचा योग आला. या भेटी दरम्यान त्यांचे मार्गदर्शन व पाठीवर पडलेली कौतुकाची थाप निश्चित येणा-या काळात माझ्याकडून पत्रकारितेच्या माध्यमातून सकारात्मक व विधायक काम करून घेईल यात शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा