सेल्फी वीथ पौष्टीक भेळ!


विवेकानंद उपहार गृहातील पौष्टीक भेळची तरूणाईला भुरळ...
माणसाचे आरोग्य जर निरोगी,सुदृढ असेल तर आयुष्याची सगळी वाटचाल सुरळीतपणे होते यात शंका नाही. म्हणून जेष्ठांची आपल्या मुलांना कायम शिकवण असते की सकस,संतुलीत व पोष्टीक आहार घ्या. गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या कायम पसंती व गुणवत्तेच्या कसोटीवर खरे ठरलेले विवेकानंद उपहार गृह म्हणजे ग्राहकांची पहिली पसंतीच होय. विवेकानंद उपहार गृहातील शुध्दता,स्वच्छता व तत्परसेवा ग्राहकांच्या पसंतीचे केंद्र आहे. 
आजच्या तरूण पीढीचा चमचमीत, चटकदार व जंक फुड खाण्याकडे मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे. मात्र दहा रूपयामध्ये पौष्टीक भेळ ग्राहकांना विवेकानंद उपहार गृहाने उपलब्ध करून दिली आहे. सर्वसामान्याच्या खिशाला परवडेल अशी पौष्टीक व चवीष्ट भेळ सद्या ग्राहकांच्या आकर्षणाचा बिंदू बनली आहे. केवळ दहा रूपयामध्ये विवेकानंद आश्रमाच्या उपहारगृहात मिळते. दुपारीपासून या पौष्टीक भेळचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी तरूणाईपासून जेष्ठांची गर्दी उपहार गृहात पाहावयास मिळते. या पौष्टीक भेळमध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथींबीर, भाजलेले मुरमूरे,चिंचेची खटाई, मक्का पोहे, शेंगदाणे, चवळी,मटकी, ताजे शेव, पोहे व दही असलेली भेळ खवय्येगिरांची पहिली पसंती ठरत आहे. ही भेळ विवेकानंद उपहार गृहात ३ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यत मिळते. जवळपासच्या खेडयातील नागरीक, प्रवासी,महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी ही भेळ रूचकर,चविष्ट व पोष्टीक भेळ खाण्यासाठी विवेकानंद उपहार गृहामध्ये एकच गर्दी करतात. आज दुपारी विवेकानंद उपहारगृहातील या स्वादिष्ट ,रुजकर व पौष्टीक भेळ्चा आस्वाद घेतला.
लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा