Responsive Ads Here

मंगळवार, १७ जुलै, २०१८

गांडूळ खत रोजगार निर्मितीचा नवा मार्ग !



सेंद्रीय खतांच्या वापराकडे शेतकरी वर्ग मोठया प्रमाणात वळला असून दिवसेंदिवस गांडुळ खताला चांगलीच मागणी वाढली आहे. गांडूळ खतामध्ये पिकासाठी आवश्यक असणारी मुख्य,दुय्यम,सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण पुरेपूर प्रमाणात असते. गांडूळ खत पिकांसाठी उपयुक्त आहे. गांडूळ खत निर्मितीमुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असल्याची माहिती कृषीभूमी ग्रुपच्या विद्यार्थींनीनी हिवरा आश्रम येथील शेतक-यांना दिली.
यावेळी अशोक इंगळे,गौतम पाखरे,रमेश देवकर,महादेव गि-हे,अनुराधा पाखरे,रामकृष्ण जटाळे,संजय बाजड,भिकाजी बनसोडे,दिनकर बोरूडे,नंदा जाधव  याच्या सह परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषीभूमी ग्रुपमध्ये अश्विनी तायडे, प्रिती राऊत, शिवानी तायडे, स्वरूपा देशमुख, प्रियंका पोले, शुभांगी शेळके, वैशाली चव्हाण, दिव्या क्षीरसागर, शुभांगी सोळंके या विद्यार्थीनींचा समावेश आहे.
विवेकानंद कृषी भूमीपुत्र ग्रुपच्या विद्यार्थींनी प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,प्रा.मनोज खोडके,प्रा अर्चना बळी यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहे.

गांडूळ खत तयार करण्याची पध्दती
सुरूवातीला तळाशी १५ सेमी जाडीचा सेंद्रिय पदार्थाचा थर द्यावा. त्यावर अर्धवट कुजलेले शेणखत चाळलेली माती ३ः१ या प्रमाणात मिसळून त्याचा १५ सेंमीचा थर द्यावा. त्यावर ताज्या शेणाचा qकवा पाण्यामध्ये शेण कालवून त्याची रबडी करून १० सेंमीचा तिसरा थर द्यावा. शेवटी बिछान्यावर सेंद्रीय पदार्थाचे आच्छादन घालावे. हा बिछाना पाण्याने ओला करावा. वातावरणानुसार आवश्यकतेनुसार पाणी द्यावे खतामध्ये ५० टक्के ओलावा टिकून राहील याची काळली घ्यावी. रचलेल्या थरांतील उष्णता कमी झाल्यावर एक ते दोन आठवडयांनी वरील सेंद्रीय पदार्थाचा थर बाजूला सारून कमीत कमी एक हजार प्रौढ गांडुळ सोडावे.

गांडुळ खताचे  फायदे
गांडूळ खताच्या वापराने जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. गांडूळ खताच्या वापराने जमिनीची धूप बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. गांडूळ खताच्या वापराने रासायनिक खतावर होणारा खर्च कमी झाल्याने शेतकरी बांधवांची आर्थिक बचत होते. पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होते.

सततच्या रासायनिक खताच्या अति वापरामुळे जमिनीच्या भौतिक,रासायनिक जैविक गुणधर्मावर विपरीत परिणाम होत आहे. त्यावर मात करण्यासाठी पिकांना लागणाèया अन्नद्रव्यांची पूर्णता करण्यासाठी रासायनिक खतांसोबत गांडूळखत दिल्यास जमिनीचे आरोग्य राखण्यास मदत होते.
                                                        डॉ.सुभाष कालवे प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीची उत्पादकता उपयुक्ता वाढीसाठी गांडूळ खत मदत करते. गांडूळ खत अत्यंत कमी कालावधीत तयार होत असून त्यांचा उत्पादन खर्च अत्यंत कमी आहे.
                                                                                अश्विनी तायडे,विवेकानंद कृषी महाविद्यालय


संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा