भूमीपूत्रचे लसीकरणाबाबत शेतक-यांना मार्गदर्शन

पावसाळा सुरू झाल्यानंतर जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार उदभवतात. या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी जनावरांना लसीकरण करणे अत्यंत महत्वाचे असते. ग्रामीण भागातील शेतक-यांना जनावरांना लसीकरण का करावे, लसीकरणाची गरज व लसीकरणा पासून होणारे फायदे याबाबत विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत ग्राम पिंपळगांव उंडा येथील शेतकयांना माहिती दिली. यावेळी  पशुधन अधिकारी डी.एस. वानेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबादास महाकाळ,शिवदास काळे,प्रमोद काळे,अनंता काळे,देवावनंद आंभारे याच्यासह शेकडो शेतक-यांना मार्गदर्शन केले. 
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या भूमीपुत्र ग्रुप मध्ये मध्ये सुमित राठोड,अक्षय इप्पर,अंकित पाझडे,गजानन शेरे,अक्षय अंबेकर,भार्गव चन्ना,आखिल गड्डे,हरीक्रष्णा पाटनशेट्टी या विद्यार्थ्यांचा समावेश आहेविवेकानंद कृषि महाविद्यालयाच्या भूमीपुत्र ग्रुपच्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.सुभाष कालवेप्रा.मनोज खोडकेप्रा.मनिक्षा कडूयांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील शेतकयांना मार्गदर्शन करीत आहे.

प्रतिबंधात्मक उपायासाठी लसीकरण                                                                                 जनावरांना घटसर्प,फ-या  हे रोग प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरवातीला होतात
या रोगांपासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी आपल्या जनावरांना वेळीच लसीकरण करणे  आवश्यकता असतेयामुळे या रोगावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण राबविण्यात येते.  हे लसीकरण दरवर्षी पावसाळ्या आधी मे किंवा जून महिन्यात करण्यात  येते.


असा प्रतिबंधक उपाय 
जनावरांना आजार उदभवू नये म्हणून  रोगप्रतिबंधक लस जनावरास टोचणे फायदेशीर ठरतेसर्व संकरित  देशी जनावरांना किमान वर्षातून दोन वेळा ऑक्टोबर - नोव्हेंबर आणि मार्च - एप्रिल महिन्यांत लस देऊन घ्यावीततज्ज्ञांकडून जनावरांचे योग्य वेळी लसीकरण करावे आवश्यक असते.

लसीकरणापूर्वी घ्यावयाची काळजी
जनावरांला लसीकरणापूर्वी आठवडाभर आधी जंतनाशक औषध द्यावे तसेच जनावराच्या अंगावरील गोचीड,गोमाश्या,लिखा,पिसा या कीटकांचे नियंत्रण करणे गरजेच आहेजनावरांची रोगप्रतिकारक्षमता वाढीसाठी सकसआहार तसेच क्षार  जीवनसत्व द्यावेत.



संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा