Responsive Ads Here

शनिवार, १४ जुलै, २०१८

जेष्ठ नागरीक कुटुंबाचा आधार स्तंभ अर्जुनराव लहाने


जेष्ठ नागरीक कुटूंब  समाजाला योग्य सल्ला  मार्गदर्शन करू शकतातलहान मुलांना सुसंस्कारीत करण्यामागे जेष्ठांची भूमिका महत्वाची आहेजेष्ठांच्या अनुभवाचा येणाèया पिढीला सुध्दाफायदा होतोजेष्ठ नागरीक हा कुटूंबाचा आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन  बुलडाणा जिल्हा जेष्ठ नागरीक संघनेचे अध्यक्ष अर्जुनराव लहाने यांनी जेष्ठ नागरीकांना मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना काढले.
कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमात आयोजित केलेल्या पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभागाच्या फेस कॉम या जेष्ठ नागरीकांच्या संघटनेच्या  दिनांक ३० ऑगस्ट २०२० रोजी होणाèया आमसभबाबतच्या नियोजन बैठक प्रसंगी शनिवारी( दि.१४) रोजी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,जेष्ठ नागरीक संघटनेचे मेहकर तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत मोहरील,उपाध्यक्ष पी.एम.गायकवाड,सचिव नरेश मिनासेतथा आदीची उपस्थिती होतीयावेळी संजाबराव सवडतकर,भिमराव शेळके,बाजीराव इंगळे,विनायकराव इंगळे,जानराव दुणगू,शामराव वडतकर,मारोतराव केंदळे,निकस गुरूजी तथा जिल्हयातील जेष्ठ नागरीक मोठयासंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सूत्रसंचालन प्रकाश पिंपरकर तर आभार प्रदर्शन रामदास वाघमारे यांनी मानले. 
जेष्ठांनी सामाजिक कार्यात मग्न रहावे
जेष्ठ नागरीकांनी आपल्या आरोग्याच्या बाबत नेहमी जागरूक असावेसकाळी नियमीत व्यायाम,प्राणायामसकस आहाराचे सेवन करावेजेष्ठांनी आपले मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी छंद,वाचनासोबतसामाजिक कार्यात मग्न राहावे असे विचार यावेळी हिवरा आश्रम येथील जेष्ठ नागरीक संघटनेचे सचिव शिवाजीराव घोंगडे यांनी बोलतांना व्यक्त केले.

संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा