विवेकानंदांच्या विचारावर आधारीत समाजनिर्मिती व्हावी- शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद
स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृती व जीवनमूल्यांचे प्रचारक होते. त्यांच्या चिंतनातून पाश्चिमात्य राष्ट्रांना सुध्दा जीवन जगण्याचे सूत्र गवसले. आजच्या ढासळलेल्या जीवनशैलीने, नैराश्य, व्यसनाधिनता, तणाव, आसक्तीइत्यादी भाव निर्माण होत आहे. स्वामीजींच्या दिव्य विचारांचे पाईक होणे व त्यांच्या विचारांवर आधारीत समाजनिर्मिती झाल्यास तो देशाचा सुवर्णकाळ ठरेल. असे उदगार अकोला जिल्हयाचे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी बुधवारी (दि.४) रोजी विवेकानंद आश्रमात भेटी प्रसंगी काढले. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त संस्थेत पुजन करण्यात आले. विवेकानंद आश्रम ही संस्था राष्ट्र निर्मीतीत देत असलेले योगदान उल्लेखनिय आहे. विद्यार्थ्यांनी विवेकानंदांच्या आदर्श ठेवावा म्हणजे बलशाली, निर्भय, चारित्र्यसंपन्न व राष्ट्रप्रेमी युवक तयार होतील. विवेकानंदांचे विचार जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करतात. मनाची एकाग्रता, भावनांचे संतुलन व अंगभूत दिव्यत्वाचे प्रगटीकरणहोण्यासाठी युवकांना त्यांनी केलेले आवाहन व्यक्ती व कालसापेक्ष आहे असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. याप्रसंगी विवेकानंद आश्रमाचे सर्व पदाधिकारी, विद्या मंदिराचे प्राचार्य,उपप्राचार्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा