विवेकानंद आश्रमात दरवर्षी प्रमाणे
याही वर्षी गुरूपौर्णिमा
उत्सव अत्यंत उत्साहात
आणि भक्तीभावाने संपन्न
केल्या जातो. या वर्षी
दि.२७ जुलैला
गुरूपौर्णिमा उत्सव संपन्न होणार
आहे. गुरूप्रती कृतज्ञता
व्यक्त करण्याचा व सद्गुरूच्या
शिकवणीनुसार मार्गक्रमण करण्याचा निश्चय
करण्याचा हा दिवस
आहे. कर्मयोगी संत
प.पू.शुकदास
महाराजांनी आपले संपूर्ण
जीवन दीन दुखी,पीडीतांच्या सेवेसाठी सर्मपित
केले होते. आरोग्यसेवा
हा त्यांच्या जगण्यातील
अविभाज्य भाग होता
म्हणून दि. २७
जुलै रोजी गुरूपौर्णिमेनिमित्त
भव्य नेत्रतपासणी शिबीराचे
आयोजन करण्यात आले
आहे. श्रीगणपती नेत्रालय
जालना येथील तज्ञ
डॉक्टरांची चमू नेत्रतपासणी
करणार असून गरजू
रूग्णांना सवलतीच्या दरात ऑपरेशनची
व्यवस्था करण्यात येणार असल्याचे
आश्रमाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.गजानन गि-हे
यांनी बोलतांना सांगीतले.
साडे आठ वाजेपासून प.पू.शुकदास महाराजश्रींच्या समाधीचे
दर्शन,पूजन व नेत्रतपासणी
शिबीराला सुरूवात होईल. सायंकाळी
सामूदायिक प्रार्थना,अनुभूती व
भगद्गीतेवरील प्रवचन संपन्न होईल
व भक्तिगीत गायनाने
कार्यक्रमाचा समारोप होईल. तरी
परिसरातील रूग्णांनी नेत्रतपासणी शिबीराचा
बहुसख्येने लाभ घेण्याचे
आवाहन विवेकानंद आश्रमातर्फे
असे कळविण्यात आले
आहे.
विविध कार्यक्रमाचे आयोजन
गुरूपौर्णिमेनिमित्त
दि. २७ जुलै
ला सकाळी ६
वाजता हरिहरतीर्थावर महाआरती
व दिंडीने ग्रामप्रदिक्षणा.
सकाळी
७ वा. प्रार्थना,अनुभूति व भगद्गीतेवर
हभप निवृत्तीनाथ येवले
शास्त्री व हभप
विष्णू थुट्टे
शास्त्री यांचे व्याख्यान संपन्न होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा