Responsive Ads Here

गुरुवार, १२ जुलै, २०१८

कासारखेड कोबी उत्पादनात अव्वल !



पारंपारीक पिका ऐवजी विविध पिके घेण्याकडे शेतक-यांचा मोठया प्रमाणात कल वाढला आहे. निसर्गाचा लहरीपणाचा फटका जरी शेतीक्षेत्राला बसत असला तरी उपलब्ध असलेल्या सिंचनसोयींचा जास्तीजास्त वापर करून शेतीची क्षेत्रातून अधिक उत्पन्न कसे घेता येईल याचा शेतकरी नेहमीच विचार करीत असतो. मेहकर तालुक्यातील कासारखेड हे गाव पेनटाकळी जलाशयामुळे सिंचनक्षेत्राखाली आले. त्यामुळे कासारखेड येथील शेतकरी भाजीपाला उत्पादन घेण्याकडे वळले. कासारखेड हे कोबी  उत्पादनात अव्वल ठरत असून या गावातील जवळपास ७० ते ८० टक्के शेतकरी आपल्या शेतात हमखास कोबी लागवड करतात. कासारखेड येथील शेतक-यां नी जवळपास दोनशे ते अडीशे एकरावर कोबीची लागवड केली आहे. याशिवाय शापू,पालक,कोंथिंबीर चे सुध्दा मोठया प्रमाणात उत्पादन कासारखेड येथील शेतकरी घेतात. कोबी ही थंड हवामानात येणारी पिके आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळपास ७२०३ हेक्टर क्षेत्रावर कोबीची लागवड केल्या जाते. साधारणपणे मे,जून किंवा जुलै,ऑगस्ट किंवा सप्टेंबर,ऑक्टोबर अशा महिन्यात कोबीची लागवड केल्या जाते. लवकर येणा-या वाणात दोन रोपांतील अंतर ४५ सेंमी तर उशिरा येणाया वाणात ६० सेंमीचे अंतर ठेवले जाते. कासारखेड गावात दरवर्षी मोठया प्रमाणात कोबीचे उत्पादन घेतले जाते. कोबी उत्पादन्नातून येथील शेतकयांनी आर्थीक  प्रगती साधली आहे.
 
कोबीसाठी पूर्व मशागत
शेतामध्ये कोबीची लागवड करण्यापूर्वी जमिनीची उभी आडवी नागरीणी करून ठेकळे फोडून जमिन भुसशीत करावी. जमिनीत २०  ते ३० टन हेक्टरी या प्रमाणात शेणखत टाकावे. त्यानंतर ४५  ते ६० सेमी अंतरावर स-या तयार करून घ्याव्या. उताराप्रमाणे वाफे तयार करावेत. कोबीवर्गीय पिकांची मुळे उथळ असल्यामुळे पाण्याच्या पाळ्या वरचेवर नियमित द्याव्या.

जलाशयामुळे सिंचन क्षेत्रात वाढ
कासारखेड गावाजवळ पेनटाकळी जलाशय असल्यामुळे या परिसरातील जमीनी सिंचनाक्षेत्राखाली आल्या आहेत. अनेक शेतक-यांनी ठिंबक, स्प्रिंल्कर यांचा मोठया प्रमाणात वापर करीत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे शेती करण्याकडे सुध्दा अनेक शेतक-यांचा कल दिसून येतो.

मी गेल्या पाच वर्षापासून कोबीचे उत्पादन घेत आहे. कोबी उत्पन्नातून हमखास उत्पन्नाची हमी असल्यामुळे कासारखेड येथील शेतकरी मोठया प्रमाणात कोबी उत्पादनाकडे वळला आहे. कोबी उत्पादनातून आर्थिक प्रगती साधली.

                                                                    अर्जुन रामचंद्र मवाळ,कासारखेड


संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा