सोच को बदलो सितारे बदल जायेंगे...नजर को बदलो,नजारे बदल जायेंगे...कश्तियाँ बदलने की जरूरत नही... दिशाओं को बदलो, किनारे बदल जायेंगे...या काव्याप्रमाणे दिव्यांगाच्या जीवनातीलनकारात्मक विचारधारेला नष्ट करून त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करण्याचे काम विवेकानंद निवासी अपंग शाळेत होत आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना सुध्दा डिजीटल युगात आपली क्षमता व बुध्दीमत्त्ता विकसीतकरण्याची संधी उपलब्ध व्हावी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहय्याने दिव्यांग विद्यार्थ्यांना सुध्दा हसत खेळत शिक्षण घेता यावे हया हेतूने हिवरा आश्रम येथील विवेकानंद अपंग निवासी शाळेने डिजीटल क्लासरूमची सुविधासुरू केली. विवेकानंद निवासी अपंग शाळेच्या या डिजीटल क्लासरूमचा इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन,वेळ व संधी मिळाल्यास यशमिळल्याशिवाय राहत नाही.याचा प्रत्यय हिवरा आश्रम येथील कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित अपंग विद्यालयात दिसून येतो. या विद्यालयात कायम दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतव्यवसायाभिमुखतेचे धडे दिले जातात.
दिव्यांग विद्यार्थ्यांना दिशा व मार्गदर्शन करून प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्याचा मुलमंत्र देण्याचे काम विवेकानंद अपंग शाळा गेल्या २४ ते २५ वर्षापासून करीत आहे. डिजीटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पायाभरभक्कम होत आहे. दिव्यांगाच्या जीवनात आनंद पेरण्याचे काम येथील विवेकानंद निवासी अपंग विद्यालय करीत आहे. विवेकानंद अपंग विद्यालयातील समर्पित शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांना डिजीटल क्लासरूमव्दारेहसत खेळत शिक्षणाचे धडे देत आहे. कला शिक्षक नंदा धाडकर,आत्माराम दळवी,ओंकार पुरी व निर्मला सांबपूरे आदींचे दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभ आहे.
हस्तकला निर्मितीचे धडे
विवेकानंद अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यावहारीक ज्ञानाचे धडे शिकविले जातात. या विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणा सोबत स्वयंरोजगार संधी निर्माण होण्याच्या दृष्टीने मेणबत्या, खडू,पायदान, फुलदानी तयार करणे, शाडूच्या मातीपासून विविध मूर्ती तयार करणे शिकविले जाते.
विवेकानंद अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना हसत खेळत क्लिष्ट व अवघड विषय सहज शिकता येतात. डिजीटल क्लासरूमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीत वृध्दी झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा