Responsive Ads Here

शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

सावित्रीच्या लेकीला लाभला गुरूचा शैक्षणिक आधार



 घरच्या प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेण्याची उमेद...उराशी बाळगेली यशाची स्वप्ने सत्यात उतरविण्याचा तिने घेतलेला ध्यास... अशाही प्रतिकूल परिस्थितीत मेहकर तालुक्यातील देऊळगांव माळी येथील कु.श्वेता जगन वाघमारे हीने शिक्षणाचा अखंड प्रवास सुरूच ठेवाला... शिक्षण  घेवून उच्चअधिकारी बनण्याचे स्वप्न श्वेताला  स्वस्थ बसू देत नव्हते. कु.श्वेताची शिक्षण घेण्यासाठी धडपड लक्षात घेत सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून देऊळगांव माळी येथील येथील शिक्षक ज्ञानदेव आनंदा बळी यांनी कु. श्वेता जगन वाघमारे हिला पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी दहा हजार रूपयांचा बाँड दिला. प्रति पंढरपूरम्हणून ओळख असणा-या देऊळगांव माळी येथील  ज्ञानदेव आनंदा बळी यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून श्वेलाला केलेली आर्थिक मदत श्वेतासाठी मोलाचीठरली आहे. ज्ञानदेव बळी हे नेहमीच  सामाजिक कार्यात असतात. त्यांनी केलेल्या आर्थिक मदतीचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.
श्वेताचे वडील जगन वाघमारे हे अल्पभूधारक असून त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. ही बाब लक्षात घेवून शिक्षणासाठी मदत केली. ज्ञानदेवआनंदा बळी हे धार्मिक प्रवृत्तीचे असून त्यांनी देऊळगांव माळी येथे गुरूदेव सेवेचा मंडळाची स्थापना करून त्यामाध्यातून तरूणांना सुसंस्कारीत करण्याचे कामकरीत आहेत. याशिवाय गरीब विद्यार्थ्यांच्या पाठीशी ते नेहमीच खंबीरपणे उभे राहतात.

 माझी शिक्षण घेण्याची जिद्द व तळमळ लक्षात घेवून सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असलेले ज्ञानेदव बळी यांनी मला आर्थिक मदत केली. त्याबद्दल मी त्यांचीआभारी आहे. त्यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे मला शिक्षण घेतांना खूप मदत होईल.
                                                                                       कु.श्वेता जगन वाघमारे विद्यार्थीनी दे.माळी

कु.श्वेता जगन वाघमारे ही अत्यंत हुशार व होतकरू विद्यार्थी आहे. श्वेताच्या घरची अत्यंत आर्थिक हालकीची असल्यामुळे  तिच्या शिक्षणात प्रतिकूल परिस्थीतीमुळेशिक्षणात खंड पडू नये किंवा अडथळा येवू नये म्हणून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने माझ्यापरीने आर्थिक मदत केली.
                                                                            ज्ञानदेव आनंदा बळी शिक्षक देऊळगांव माळी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा