परिश्रम व संयम यशाचा मूलमंत्र - आत्मानंद थोरहाते.


विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात आपली बौध्दीक क्षमता सिध्द करावी. ज्ञानाजर्नातून मिळणारा निर्भेळ आनंद हा जगातील  सर्वांत श्रेष्ट आनंदआहे. यशप्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन, सातत्य, चिकाटी कायम ठेवावी. परिश्रम व संयम यशाचा मूलमंत्र असल्याचे विचार विवेकानंद आश्रमाचेसहसचिव आत्मानंद थोरहाते यांनी बुधवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना काढले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद कृषी महाविद्यालयात आयोजित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशीकच्या मुक्त कृषी शिक्षण केंद्राच्या सत्र २०१८ -१९ च्या सत्राच्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन करून झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्र प्रमुख डॉ.सुभाष कालवे तर प्रमुख पाहूणे म्हणून आश्रमाचे सचिव संतोष गोरे, केंद्र संयोजक प्रा.मंगेश जकाते, प्रा.मनोज खोडके तथा आदींची प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.मंगेश जकाते तर सुत्रसंचालन प्रा.मनोज खोडके तर आभार प्रदर्शन प्रा.समाधान जाधव यांनी मानले.

कृषी शिक्षणाची गरज
भारत हा कृषी प्रधान देश आहे. कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्वाचा बिंदू असून महाराष्ट्रातील सुमारे ६० ते ६५ टक्के  ग्रामीण भागातील लोकांच्या उपजिविकेचे प्रमुख साधन आहे. ग्रामीण भागातील भागातील विद्यार्थ्यांनी कृषी शिक्षण घेतले तर त्याचा फायदा ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना होईल. शेती क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी कृषी शिक्षणाची गरज असल्याचे विचार आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी बोलतांना सांगीतले.

1 टिप्पणी: