Responsive Ads Here

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

शनि कवचं



अथ श्री शनिकवचम् 
अस्य श्री शनैश्चरकवचस्तोत्रमंत्रस्य कश्यप ऋषिः II 
अनुष्टुप् छन्दः II शनैश्चरो देवता II शीं शक्तिः II 
शूं कीलकम् II शनैश्चरप्रीत्यर्थं जपे विनियोगः II 
निलांबरो नीलवपुः किरीटी गृध्रस्थितस्त्रासकरो धनुष्मान् II 
चतुर्भुजः सूर्यसुतः प्रसन्नः सदा मम स्याद्वरदः प्रशान्तः II II 
ब्रह्मोवाच II 
 श्रुणूध्वमृषयः सर्वे शनिपीडाहरं महत्
कवचं शनिराजस्य सौरेरिदमनुत्तमम् II II 
कवचं देवतावासं वज्रपंजरसंज्ञकम्
शनैश्चरप्रीतिकरं सर्वसौभाग्यदायकम् II II 
ॐ श्रीशनैश्चरः पातु भालं मे सूर्यनंदनः
नेत्रे छायात्मजः पातु पातु कर्णौ यमानुजः II II 
नासां वैवस्वतः पातु मुखं मे भास्करः सदा
स्निग्धकंठःश्च मे कंठं भुजौ पातु महाभुजः II II 
स्कंधौ पातु शनिश्चैव करौ पातु शुभप्रदः
वक्षः पातु यमभ्राता कुक्षिं पात्वसितत्सथा II II 
नाभिं ग्रहपतिः पातु मंदः पातु कटिं तथा
ऊरू ममांतकः पातु यमो जानुयुगं तथा II II 
पादौ मंदगतिः पातु सर्वांगं पातु पिप्पलः
अङ्गोपाङ्गानि सर्वाणि रक्षेन्मे सूर्यनंदनः II II 
इत्येतत्कवचं दिव्यं पठेत्सूर्यसुतस्य यः
न तस्य जायते पीडा प्रीतो भवति सूर्यजः II II 
व्ययजन्मद्वितीयस्थो मृत्युस्थानगतोSपि वा
कलत्रस्थो गतो वापि सुप्रीतस्तु सदा शनिः II १० II 
अष्टमस्थे सूर्यसुते व्यये जन्मद्वितीयगे
कवचं पठतो नित्यं न पीडा जायते क्वचित् II ११ II 
इत्येतत्कवचं दिव्यं सौरेर्यनिर्मितं पुरा
द्वादशाष्टमजन्मस्थदोषान्नाशायते सदा
जन्मलग्नास्थितान्दोषान्सर्वान्नाशयते प्रभुः II १२ II 
 II इति श्रीब्रह्मांडपुराणे ब्रह्म-नारदसंवादे शनैश्चरकवचं संपूर्णं II 

मराठी अर्थः 
शनी कवच हे संस्कृत मध्ये असून ते ब्रह्मांड पुराणांतील ब्रह्मदेव नारद यांच्या संवादामुळे आलेले आहे. या कवचाचे कश्यप हे ऋषी आहेत. अनुष्टुप हा छन्द आहे. शनैश्चर ही देवता आहे. शूं ही शक्ति आणि शीं हे कीलक आहे. शनैश्चर देवतेची कृपा व्हावी म्हणून हे कवच म्हंटले जात आहे. 
१) त्याचे शरीर निळ्या रंगाचे आहे. त्याने निळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. तो नेहमी आनंदी आहे. पैशाचे लोभी असलेल्या लोकांच्या मनांत भय निर्माण करण्याची इच्छा असलेल्या, शांत व गंभीर शानिदेवाने मला आशीर्वाद द्यावा. 
२) ब्रह्मदेव सर्व ऋषींना म्हणाले, हे ऋषींनो हे सूर्याने निर्मिलेले, अति पवित्र, आध्यात्मिक, महान व अति उत्तम असे शनीकवच आहे. आणि ते शनीमुळे निर्माण होणार्या सर्व त्रासांपासून मुक्तता करते. 
३) हे कवच स्वतः शनिदेवाचे आवडते आहे. व या कवचांत ते वास करतात.वज्रासारखे अभेद्य असे हे कवच आहे. 
४) ओम असा उच्चार करून मी शनिदेवाना नमस्कार करतो. सूर्यपुत्राने माझ्या कपाळाचे रक्षण करावे. छायात्मजाने माझ्या डोळ्यांचे रक्षण करावे. यमानुजाने माझ्या कानांचे रक्षण करावे. 
५) वैवस्वताने माझ्या नाकाचे, भास्कराने माझ्या मुखाचे, स्निग्धगंधाने माझ्या कंठाचे तर महाभुजाने माझ्या बाहुंचे रक्षण करावे. 
६) शनीने माझ्या खांद्यांचे तर शुभप्रदाने माझ्या हातांचे, यमभ्रात्याने माझ्या छातीचे व असिताने माझ्या कुक्षीचे रक्षण करावे. 
 ७) ग्रहपतिने माझ्या नाभीचे, मंदाने माझ्या कंबरेचे, अंतकाने माझ्या वक्षःस्थळाचे तर यमाने माझ्या गुडघ्यांचे रक्षण करावे. 
८) मंदगतीने माझ्या पावलांचे, पिप्पलादाने माझ्या शरीराच्या सर्व भागांचे, तर शरीर मध्याचे व गुप्तांगाचे सूर्यनंदनाने रक्षण करावे. 
९) जो कोणी सूर्यपुत्राच्या या पवित्र कवचाचे पठण करेल त्याची शनीपासून होणार्या त्रासांतून मुक्तता होते. 
१०) जरा एख्याद्याच्या जन्मपत्रिकेंत शनी १२व्या घरांत (व्ययांत) असेल, पहिल्या घरांत (लग्नांत), दुसर्या घरांत (धनांत), आठव्या घरांत (मृत्यु) किंवा सप्तमांत असेल तरीसुद्धा हे कवच रोज म्हंटले तर शुभफळेच देईल. 
११) पत्रिकेंत अष्टम स्थान, व्यय स्थान, प्रथम स्थान व द्वितीय स्थान ही शानिसाठी अशुभच आहेत. परंतु ज्याच्या पत्रिकेंत वरील स्थानी शनी असूनही त्याने या कवचाचा पाठ रोज केल्यास शनीच्या अशुभ फलांचा अनुभव न येता उलट शुभ फलेच अनुभवास येतात. 
१२) हे शनी कवच अतिशय पवित्र, आध्यात्मिक व प्राचीन आहे. जन्मवेळी शनी पत्रिकेंत त्याच्या अशुभ स्थानांत म्हणजे १२व्या, ८व्या किंवा १ल्या स्थानांत असला तरी हे कवच जन्मस्थ दोषांपासून मुक्त करते. 
अशा रीतीने हे ब्रह्मांड पुराणांतील ब्रह्मदेव व नारद ऋषींनी चर्चिलेले शनी कवच पुरे झाले.
जन्मपत्रिकेंत शनी वक्री-स्तंभी असेल, मंगल-रवी-हर्षल-राहू-केतू यांपैकी एकाबरोबर किंवा जास्त ग्रहांबरोबर असेल, किंवा त्यांनी दृष्ट असेल, मंगल-रविच्या राशींत असेल अगर अशुभ स्थानी असेल, तर वैवाहिकसौख्य, संततीसौख्य, पितृसौख्य, नोकरी-धंद्यांत बरकत किंवा सर्व प्रकारचे ऐहिक सौख्य मनासारखे मिळण्याची शक्यता कमी असते. असे होऊ नये म्हणून हे शनीकवच रोज म्हणावे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा