बल हेच जीवन
या स्वामी विवेकानंदांच्या
दिव्य
विचारांनी युवा
पिढीला कायम प्रेरणा,स्फुर्ती व उत्साहवर्धन
केले आहे. बल
उपासने शिवाय आयुष्यात कुठलेही
यश, पराक्रम,पुरूषार्थ
होणे शक्य नाही.
शारीरीक सामर्थ्यामध्ये वाढ
करायची असेल तर
नियमीत व्यायाम करावा. शालेय
दशेपासून विद्यार्थ्यांनी आपला
काही काळ तरी
क्रीडांगणावर घालवावा. क्रीडा स्पर्धेतून
विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात तर वाढ
होतेच पण त्यासोबत
आरोग्य सुदृढ होण्यासाठी मोलाची
मदत होते. विवेकानंद
विद्या मंदिराच्या स्थापनेपासून कर्मयोगी
संत प.पू.शुकदास महाराजश्रींनी विद्या
मंदिरातील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात
आपल्या दैदिप्यमान कामगिरीने चमकावा
यासाठी नेहमीच आग्रह घेतला.
विवेकानंद विद्या मंदिर व
कनिष्ठ महाविद्यालयाने गेल्या
अनेक वर्षापासून क्रीडा
क्षेत्रात कायम विजयाची
परंपरा कायम ठेवली.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास
महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम
व्दारा संचालित विवेकानंद विद्या
मंदिर व कनिष्ठ
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मेहकर येथे पार
पडलेल्या तालुका स्तरीय कुस्ती
स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून
या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय
कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली
आहे. ४५
वजन गटामधून सुजीत
घायवट,४९ वजन
गटामधून ओम दळवी,५४ वजनगटामधून
ओम गोरे,६३
वजन गटामधून ओम
गिरी,६९ वजनगटामधून
रोहन पडघान, ७६
वजन गटामधून अभिजीत
गायकवाड, ८४ वजनगटा
मधून सागर गोसावी
हे विद्यार्थी तर
३५ वजन गटामधून
कु.अंकीता टेकाळे,४३ वजन
गटामधून कु.साक्षी
खरात,४६ वजनगटामधून
कु.शितल बोरकर,५६ वजनगटामधून
कु.संजिवनी हिवलेकर
तर ६० वजन
गटामधून कु. प्रतिक्षा
जाधव या विद्यार्थीनींनी
मेहकर येथे पार
पडलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून
त्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
झाली आहे. या यशस्वी
खेळाडूंची तयारी क्रीडा शिक्षक रणजीत
जाधव,आत्मानंद थोरहाते,
गोविंद अवचार, शाम खरात
यांनी करून घेतली.
कुस्ती स्पर्धेतील यशस्वी खेळाडुंचे
विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष
गोरे,सहसचिव विष्णुपंत
कुलवंत,आत्मानंद थोरहाते,विश्वस्त
पुरूषोत्तम आकोटकर,विवेकानंद विद्या
मंदिराचे मुख्याध्यापक अणाजी सिरसाट, उपमुख्याध्यापक
प्रा.कैलास भिसडे,पर्यवेक्षक अशोक गिèहे,आत्माराम
जामकर यांनी कौतुक
करून पुढील स्पर्धेसाठी
शुभेच्छा दिल्या.
व्हॉलीबॉल स्पर्धेत राष्ट्रीय
पातळीवर
विवेकानंद
विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांची व्हॉलीबॉल
स्पर्धेची तयारी नियमीत करून
घेतल्या जाते. समर्पित क्रीडा
शिक्षक विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी नेहमीच तत्पर
असतात. विद्यार्थ्यांकडून अधिका अधिक सराव
करून घेतल्यामुळे विवेकानंद
विद्या मंदिर व कनिष्ठ
महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनी
व्हॉलीबॉल स्पर्धेत राष्ट्रीय पातळीपर्यंत
मजल मारली.
क्रीडा स्पर्धेत कायम
विजयी
क्रीडा स्पर्धेत विवेकानंद विद्या
मंदिर व कनिष्ठ
महाविद्यालयाचे विद्यार्थी व्हॉलीबॉल,खो
खो,कब्बडी,फुटबॉल
या सांघिक स्पर्धेत
तर धावणे,गोळा
फेक,उंच उडी,लांब उंडी,थाळी फेक
या मैदानी क्रीडा
स्पर्धेत कायम विजयी
ठरत आहे. विवेकानंद विद्या मंदिाराचा
शुभम सोनूने हा
विद्यार्थी बुध्दीबळ या वैयक्तीक
स्पर्धेत राज्यावर दोन वेळा
खेळून आला.
विवेकानंद
विद्या मंदिर व कनिष्ठ
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेची तयारी
करून घेतली जाते.
प्रत्येक क्रीडा स्पर्धेत विद्यार्थी
नेहमीच यशस्वी होतात.
रणजित
जाधव,
क्रीडा
शिक्षक,
विवेकानंद
विद्या
मंदिर
संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ
श्रीनिवासी
विवेकानंद नगर,हिवरा
आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा