हिवरा आश्रम
येथील मनिष विठ्ठलदास खत्री व सौ. मोनिका मनिष खत्री या उच्च विद्याविभूषीत
दामत्यांनी गोरगरीबांच्या मुलांची शिकवणी वर्गामुळे परवड होवू नये. गोर गरीबांच्या
मुलांना मोफत शिकवणी वर्गात चांगल शिक्षण मिळावे. या करीता सामाजिक बांधिलकीच्या
भावनेतून परिसरातील गोरगरीब,मजूरांच्या
मुलांसाठी आपल्या घरी मोफत शिकवणी वर्ग सुरू केला. खत्री दांपत्यांनी आपल्या
कृतीतून ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुलेंचा शैक्षणिक वारसा सुरू ठेवल्याने
त्यांचे परिसरात कौतुक होत आहे. मोनिका खत्री या कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज
संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. तर मनिष
खत्री हे चिखली येथील अनुराधा पॉलीटेक्निक कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत
आहे. शिकवणी वर्गासाठी घरी येणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात
घेवून त्यांची शिक्षणात गोडी निर्माण केली आहे. शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांची
दुसरी आईचं असते. मोनीका खत्री व मनिष खत्री यांच्या निशुल्क शिकवणी वर्गात
येणा-या प्रत्येक मूलाकडे जातीने लक्ष देतात. या शिकवणी वर्गामध्ये येणा-या
मुलांची मराठी, हिंदी, इंग्रजी,
गणित,विज्ञान या विषयांची तयारी करून घेतली
जाते. याशिवाय कोवळया मनावर मूल्यशिक्षणाचे बीजारोपन सुद्धा केले जाते. हिवरा
आश्रम येथील खत्री दांपत्यांच्या शिकवणी वर्गात मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमाची
इयत्ता पहिली पासून ते इयत्ता नववी पर्यंतचे मुले मुलींचा समावेश
आहे. दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळात हा मोफत शिकवणी
वर्ग असतो.
गोरगरीबांच्या
मुलांची उजळली शैक्षणिक वाट
या मोफत शिकवणी
वर्गाचा लाभ गावातील मोल मजूरी करणा-या पाल्यांच्या ३० ते ४० मुलांना
लाभ होत आहे. खत्री दांपत्यांनी मोफत सुरू केलेल्या
शिकवणी वर्गातून गोरगरीबांच्या मुलांची शैक्षणिक वाट उजळून निघाली आहे.
गोर गरीबांच्या
मुलांची शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी १ वर्षापूर्वी मोफत शिकवणी वर्गाची सुरूवात
केली. या शिकवणी वर्गाचा विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता उपयोग होत आहे.
प्रत्येक वयोगटातील विद्यार्थ्यांना या मोफत शिकवणी वर्गाचा लाभ होत आहे.
मोनिका मनिष खत्री हिवरा आश्रम
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा