गेल्या तीन ते चार वर्षांपासून पावसाची
सरासरी कमी झाल्याने दरवर्षी उन्हाळयामध्ये पशुपालकांसमोर जनावरांसाठी चा-यांची
समस्या उभे राहते. महाराष्ट्र राज्यात दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात पशूपालकांसमोर
चारा टंचाईचे संकट उभे राहते. पशूपालकांची चारा टंचाईमुळे होणारी परवड लक्षात
घेवून हिवरा आश्रम येथील सोयरे वनचरे फाऊंडेशने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून
बुलडाणा जिल्हयातील मेहकर, लोणार, शेगावं व सिंदखेड राजा या तालुक्यात शेतकरी
बांधवांचे चारा टंचाई बाबत समुपदेशन करून त्यांना आपल्या शेतामध्ये चारा पेरणीसाठी
प्रेरीत केले. कुठल्याही प्रकारच्या शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता चारा टंचाईवर
मात करण्यासाठी हिवरा आश्रम येथील वनचरे फाऊंडेशने घेतलेल्या पुढाकाराचे
सर्वस्तरावरून कौतुक होत आहे. दुष्काळग्रस्त भागात निर्माण झालेल्या पाणी टंचाई व
चारा टंचाई निर्माण झाली आहे. चारा टंचाईमुळे जिल्हातील पशुपालक आपले गोधन विक्री
काढत आहे. चारा टंचाईवर मात करण्यासाठी शासकीय मदतीची अपेक्षा न ठेवता स्वयंसेवी
संस्था,सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येण्याची गरज आहे. चारा
टंचाईसाठी आपण काय करू शकतो या विषयावर चिंतन करण्यासाठी पशु सवंर्धन,मत्स्य
व दुग्ध विकास मंत्री ना. महादेवराव जानकार, सहकार मंत्री ना.सुभाषराव देशमुख,
यांच्या उपस्थितीत बीजेएस चे अध्यक्ष शांतीलाल मुथा, भारत विकास ग्रुपचे हनुमंतराव
गायकवाड, १००० सामाजिक संस्थाचे संघटन करून महा.एन.जी ओ फेडरेशन बनविणारे विजय
वरूडकर,शेखर मुंदडा,वरद गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे संपन्न झाली.
जिल्हयातील सामाजिक संस्था,सेवाभावी व्यक्तीने चारा टंचाईवर मात करण्यासाठी
पुढाकार घेतल्यास बुलडाणा जिल्हयात चारा टंचाईवर मात करण्यास मदत होईल. मेहकर
तालुक्यातील दुधा येथील पंजाबराव सुखदेव चव्हाण यांच्या दोन हेक्टर शेतात
चारा पेरणी करण्यात आली. सिंदखेड राजा तालुक्यातील अॅड आशीष मुळे यांनी आपल्या ५
हेक्टर शेतात चार पेरणी तसेच शेगाव तालुक्यातील पांडुरंग बळीराम डवंगे यांनी
सुध्दा आपल्या शेतात चारा टंचाईवर मात करण्यासाठी चारा पेरणी केली आहे. तर लोणार
तालुक्यातील शारा येथील शेतकरी भागवत नारायण साळवे यांनी बेवारस गाईंचे पालकत्व
घेतले.
बुलडाणा जिल्हयातील तालुक्यात चारा पेरणी
करण्यात आलेला चारा पशूपालकांना देण्यात येईल. चारा टंचाईवर मात करण्यासाठी शासन,
प्रशासन, स्वयंसेवी संस्था, गरजू पशूपालक यांच्या संयुक्तपणे हा उपक्रम यशस्वी
करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.
सर्पमित्र वनिता
बोराडे अध्यक्ष, सोयरे वनचरे फाऊंडेशन हिवरा आश्रम
दरवर्षी एप्रिल,मे महिन्यात चारा टंचाईची समस्या
निर्माण होते. यासाठी माझ्या दोन हेक्टर शेतात चारा पेरणी केली आहे. शेतातील
हा चारा पशूपालक व चारा छावण्यासाठी देण्यात येईल.
पंजाबराव सुखदेव चव्हाण,शेतकरी दुधा
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा