Responsive Ads Here

शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१९

हिवरा आश्रम येथे आजपासून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन


राज्य विज्ञान शिक्षण नागपूर, जिल्हापरिषद शिक्षण विभाग, जिल्हा विज्ञान शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने भरविण्यात येणारे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन यावर्षी कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद ज्ञानपीठ शाळेत दि. १६ व १७ रोजी आयोजीत करण्यात येणार आहे. या प्रदर्शनीचे उदघाटन शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहूणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी हे राहणार आहेत.
विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टीकोन वृध्दींगत व्हावा विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात गोडी निर्माण व्हावी यासाठी या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते. निसर्गाबदल प्रेम व पर्यावरण विषयक जाणीव जागृती, लोकसंख्या शिक्षण, लैंगिक शिक्षण, विज्ञान विषयातील संशोधनवृत्ती इत्यादी बदल प्रदर्शनीत उपकरणे चार्ट यांचा सहभाग राहणार आहे. बालवैज्ञानिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या प्रदर्शनात आपले उपकरण घेऊन सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा