किडनीस्टोन आजार,लक्षणे व उपचार kidney disease


भारतात दिवसेंदिवस किडनीस्टोनच्या रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. किडनी स्टोन अर्थात मुतखडा या आजाराची समस्या आज दिवसेंदिवस सामान्य होत चालली आहे. किडनीस्टोन या आजारामध्ये रूग्णाला खूप वेदना होतात.

काय आहे किडनी स्टोन
कॅल्शियम कॉस्फेट,कॅल्शियम ऑक्सोलेट,यूरिक अ‍ॅसिड आणि अमोनिया फॉस्फेट यासारख्या रसायनापासून स्टोन निर्माण होतो.शारयुक्त पाण्यापासून तयार झालेले पदार्थाचे सेवन केल्यानंतर किडनीस्टोन होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. हे स्टोन किडनीमधून युरेटर नामक संकिर्ण नळीव्दारे मुत्राशयात येतात. हा मुतखडा लहान आकाराचा असल्यास सहज लघवीवाटे शरीराच्या बाहेर फेकला जातो. मात्र मोठया आकाराचा किडनीस्टोन मूत्रवाहिनीमध्ये अडकल्यामुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण झाल्यामुळे खूप वेदना होतात.

अशी आहे किडनीस्टोनची लक्षणे
ज्या व्यक्तीला किडनीस्टोन झाला आहे त्या व्यक्तीला लघवी करतांना जळजळ होती.वारंवार लघीवीस जाण्याची इच्छा होते.कधी कधी लघवी करतांना लघवीत रक्त येते.याशिवाय मळमळ वाटणे,ताप येणे,अंगदुःखी यासारखी लक्षणे किडनीस्टोन झालेल्या व्यक्तीला जाणवतात.
माणसाच्या शरीरातील मीठ आणि मुत्रातील खजिन पदार्थ एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे किडनीस्टोनचा धोका निर्माण होतो. जर आपण किडनीस्टोनच्या आजाराने ग्रस्त आहात तर मुळीच घाबरून जाऊ नका. आपल्या घरी असलेल्या घरघुती उपयांनी सुध्दा किडनीस्टोन आजारावर मात करता येते.

ओवा वापर करा
ओवा किडनीस्टोनसारख्या आजारात टॉनिक म्हणून काम करू शकतो. त्यामुळे आहारात, मसाल्याच्या रुपात ओव्याचा समावेश असावा असा डॉक्टरही सल्ला देत असतात. कारण, लघवीला चालना देण्यात ओवा मदतकारी ठरतो.

आहारात केळीचा वापर करा
जर आपण किडनीस्टोन आजाराने ग्रस्त आहात तर आपण आपल्या आहारात केळी चा वापर करा. केळ्यात बी-६ नावाचे जीवनसत्व असते. बी- ६ या जीवनसत्वामुळे किडनीस्टोनच्या  निर्मितीला आळा बसतो. तसेच किडनीस्टोन झालेल्यांना केळ्याच्या सेवनाने आराम पडतो.
तुळस
किडनीस्टोन झालेल्या व्यक्तीसाठी तुळस रामबाण औषध आहे. तुळस घालून नियमित चहा घेतल्याने किडनी स्टोनच्या आजारापासून आराम पडतो. तसेच तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने खडा लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते.

आहारा  द्राक्षांचा वापर करा.
ज्या व्यक्तीला किडनीस्टोन आहे त्यांनी किडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी आपल्या आहारात द्राक्षांचे सेवन करावे. द्राक्षा अलबुमीन आणि सोडिअम क्लोराइड यांचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे किडनी स्टोन आजाराने ग्रस्त असलेल्यांनी फळांमध्ये द्राक्षांना प्रधान्य द्यावे.
वरील नैसर्गिक पदार्थांमुळे किडनी स्टोनच्या आजारावर आराम मिळतो.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा