रासेयो शिबीरात समाजप्रबोधचा जागर !


जवान मर्द तू असा कसा रे वागतो,दारू पितो धिंगाना करतो...सोडा आता ही व्यसनाधीनता...मरी माय आली आता मरी माय आली...शिक बाबू शिक शाळा तू शिक... अशी एकापेक्षा एक अधिक सरस समाजप्रबोधनात्मक गीते सादर करून शाहिर ईश्वर मगर यांच्या लोककला जागर मंच हिवरा आश्रम यांनी  रासेयो शिबीरात मंगळवारी ता. १९ रोजी समाजप्रबोधन केले.
 कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्यालय व विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे  राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष शिबीराचे दि. १७ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी पर्यंत मेहकर तालुक्यातील दत्तक ग्राम लव्हाळा येथे आयोजन केले आहे. या रासेयो शिबीरातून विद्यार्थ्यांच्या मनावर समाजसेवेचे संस्कार रूजण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी शाहिर सज्जनसिंग राजपूत यांनी राष्ट्र जागवा जागृत व्हा तरूणांनो...ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी मला जीजाऊ,सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी...जर्द सुपारी चुना लावून घोळून केला घुटका... जय जय महाराष्ट माझा जय जय महाराष्ट्र माझा... यासारखी गीते सादर करून तरूणांईची मने जिंकली. शाहिर सज्जनसिंग राजपूत यांनी आपल्या गीतांतून राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, साक्षरता यावर प्रकाश टाकणारी गीते सादर करून उपस्थितांचे समाजप्रबोधन केले.   
लोककला ही मनोरंजनाचे प्रमुख माध्यम असून त्या कलेतून मनोरंजनासोबत सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिल्यास त्याचा जनमाणसाच्या मनावर कायम ठसा उमटतो हे शाहिर ईश्वर मगर, शाहिर सज्जनसिंग राजपूत यांनी आपल्या कार्यक्रमातून दाखविले. यावेळी शाहिर सज्जनसिंग राजपूत यांनी तरूण कसा असा,तरूणाचे ध्येय काय असावे या विषयी गीत सादर करून तरूणांची मने जिंकली.

या कार्यक्रमाला हार्मोनियम जीवन केंदळे,तबला निलेश थोरहाते,अनिल बोरकर यांनी साथसंगत  केली. यावेळी सरपंच दिनकर कंकाळ,उपसरपंच अमोल गारोळे,तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश लहाने,ग्रा.पं.सदस्य  विजय कंकाळ,भागवत गारोळे,प्रदीप लहाने,चंद्रभान लहाने,गणेश हिवाळे,मधुकर तायडे,अशोक गारोळे,रवींद्र लहाने,गणेश गारोळे,शाळा समिती अध्यक्ष संतोष गारोळे, रासेयो अधिकारी प्रा.आकाश इरतकर, प्रा.प्रतिक उगले, प्रा.रवींद्र काकड,विशाल काकड, प्रा.ज्ञानेश्वर जाधव, प्रा.जाधव मॅडम, पत्रकार संतोष थोरहाते,ज्ञानेश्वर म्हस्के,विद्यार्थी,विद्यार्थीनी,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. 

जनजागृतीसाठी तरुणाईचा पुढाकार  
या रासेयो शिबिरात विवेकानंद कृषी महाविद्यालय व विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे  राष्ट्रीय सेवा योजनाचे शिबिरार्थी ग्रामस्थांना ग्रामस्वच्छता,झाडे लावा झाडे जगवा, अंधश्रद्धा, हुंडाबळी, साक्षरता, स्त्रीभ्रूणहत्या याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करीत आहे. 


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा