हिवरा आश्रमचे घनश्याम गोरे बनले योगप्रचारक !


शहरी भागात योग विद्येच्या प्रचाराचे कार्य करणा-या अनेक व्यक्ती व संस्था दिसून येतात. मात्र ग्रामीण भागात योगप्रचाराचे कार्य तेही आपली नोकरी सांभाळून निशुल्क करण्याचे काम हिवरा आश्रम येथील  घनश्याम तुकाराम गोरे करीत आहे. घनश्याम गोरे  हे साखरखेर्डा येथे बुलडाणा अर्बन येथे कार्यरत आहे. त्यांना लहानपणापासून योगा विषयी कमालीचे आकर्षण होते. यासाठी त्यांनी योगासंबंधी अनेक ग्रंथाचे वाचन करून योगासन व प्राणायामामध्ये कसब प्राप्त केले. घनश्याम गोरे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गेल्या पाच ते सहा वर्षापासून योगप्रचाराचे कार्य अविरतपणे करीत आहे.  हिवरा आश्रमचे योगगुरू नाना इंगळे यांच्या सानिध्यात त्यांना योगासने करण्याची आवड निर्माण झाली. घनश्याम गोरे यांनी बुलडाणा,वाशिम,अकोला या ठिकाणी विविध योग व प्राणायाम शिबीराच्या माध्यमातून मोठे काम केले आहे. आतापर्यंत त्यांनी चारशे ते पाचशेहून अधिक शिबीर घेतले आहे. आठ ते दहा हजार नागरिकांना त्यांच्या योग प्राणायाम शिबीराचा लाभ होऊन अनेकांच्या आरोग्याच्या समस्या दूर झाल्या. भारतीय योगविद्येचा प्रसारासाठी नोकरी सांभाळून  ते योगशिबीराच्या माध्यमातून नागरीकांना निरोगी आरोग्यासाठी योग प्राणायाम करण्याचा सल्ला देत आहे.

योग प्राणायामाचे फायदे
प्रत्येकाने नियमीत योग व प्राणायामाचा सराव केल्यास शरीर व मन संतुलीत होते.योगासनाच्या सरावाने शरीर निरोगी व सदृढ होण्यास मदत होते.प्राणायामाच्या नियमीत सरावाने मनुष्याचे शरीर व मन दोन्ही संतुलित राहते. प्राणायामामुळे शरीरातील  ८० टक्के विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. प्राणायाम मुळे चयापचय सुधाररून वजन कमी होण्यास मदत होते. रक्ताभिसरण सुधारल्याने चेह-यावर तेज येते. प्राणायामामुळे पोटविकार,अपचन,गॅसेस इत्यादी दूर होतात. याशिवाय रक्तदाब सुध्दा नियंत्रित होतो.हदय, मज्जासंस्था बळकट होते.फुफ्फुसे निरोगी होतात.एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते.

योग प्राणायामाच्या नियमीत सरावाने शरीर,मन व आत्मा सुसुत्रबध्दता निर्माण होवून निरोगी आरोग्य टिकविण्यास मदत मिळते. शिबीरातील शिबीरार्थीच्या जीवनात आनंद निर्माण होवून ताणतणावाचे प्रमाण कमी होवून रोगप्रतिकार शक्तीत,सहनशक्ती वाढून आरोग्यदायी अनुभव येतो.

                                                घनश्याम गोरे योगप्रचारक हिवरा आश्रम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा