आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानसाच्या
जीवनात आमुलाग्र बदल झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे वेळची बचत होते.
मेहकर तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी विज
ग्राहकांची ऑनलाईन विज बील भरणा करण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. मेहकर
तालुक्यातील ५ ते ६ हजार विज ग्राहक नेट बँकिंग किंवा ऑनलाईन अॅप व्दारे आपल्या वीज बिलाचा भरणा करीत
आहे. ग्रामीण भागातून ऑनलाईल विज बील भरणा करण्याकडे सकारात्मक
प्रतिसाद मिळत असल्याचे महावितरणाचे तालुका उपविभागीय अधिकारी राजेश नाईक
यांनी दैनिक सकाळशी बोलतांना सांगीतले. जास्तीत जास्त विज बील ग्राहकांनी ऑनलाईन
बील भरणा करावा. जणेकरून वेळेची बचत होईल. डिजीटल विज ग्राहकांना विज बीलाचा
भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही असेही त्यांनी यावेळी
बोलतांना सांगीतले. ऑनलाईन विज बील भरण्यासाठी महावितरण कंपनीने संकेतस्थळ कार्यान्वित
केले आहे. नोंदणीकृत ग्राहकांला विज बिल जनरेट झाल्याबरोबर त्याच्या नोंदनीकृत
मोबाईल क्रमांवर विज बिलाची रक्कम व भरणा दिनांकाची माहिती मिळते.
विज ग्राहकांसाठी एमएमएस सुविधा
विज ग्राहक १८००२००३४३५ या क्रमांकावर
मोबाईल नोंदणीकृत करून आपल्या मोबाईल वर
मॅसेजव्दारे बिल रिडींग,बिल जनरेट,डय्यु डेट, लोडशेडींगची
इत्यादीची माहिती मिळते.ग्राहकांचा मोबाईल नंबर नोंदणीकृत नसेल तर माहिती मिळणार
नाही.
मोबाईल अॅपच्या माध्यमातून मी एक
वर्षापासून माझ्या विज बीलाचा ऑनलाईन भरणा करीत आहे. यामुळे वेळची बचत होते. विज
बिल भरण्यासाठी तासनतास रांगेत उभी राहण्याची गरज भासत नाही. आपण घरबसल्या गुगल पे,भीम अॅप,पेटीएम व्दारे आपल्या विज बीलाचा भरणा करू शकता.
राजेश रौंदळकर हिवरा आश्रम,
महावितरण विभागाकडून विज ग्राहकांना
मॅसेजव्दारे बिल रिडींग,बिल जनरेट,बिल रिडींग घेण्याची दिनांक,डय्यु डेट इत्यादी माहिती क्षणार्धात मिळते. या सर्व प्रणालीमुळे कुणालाही
विचारपूस करण्याची गरज भासत नाही.
राजेश नाईक, उपविभागीय अधिकारी
महावितरण उपविभाग मेहकर
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा