Responsive Ads Here

रविवार, १७ फेब्रुवारी, २०१९

किमया बुधवाणीचे लाय फाय उपकरण राज्यस्तरावर


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना  विज्ञानाची गोडी लागावी. शालेय विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व संशोधनवृत्तीला चालना मिळावी म्हणून येथील कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद ज्ञानपीठामध्ये दि. १६ फेब्रुवारी ते दि. १७ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये हिवरा आश्रम येथील कु.किमया कमलेश बुधवाणी हिच्या लाय फाय हे  उपकरण जिल्हास्तरावर प्रथम आले असून किमया बुधवानीचे  लाय फाय या उपकरणाची राज्यस्तरावर निवड झाली. ग्रामीण भागातील या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये बुलडाणा जिल्हयातील १२५  बालवैज्ञानिकांनी आपली विज्ञान उपकरणे घेवून सहभाग नोंदविला होता. कु.किमया बुधवाणी ही विवेकानंद आश्रमाचे माजी सचिव तथा विवेकानंद विद्या मंदिरातील कार्यरत असलेले शिक्षक कलेश बुधवाणी व मधुमती बुधवाणी  यांची मुलगी आहे. किमया हीला लहानपणापासून विज्ञान विषयाची आवड आहे. कमलेश बुधवाणी हीने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्हा परिषद विभाग व जिल्हा विज्ञान शिक्षण संघटना यांच्या वतीने हिवरा आश्रम येथील विवेकानंद ज्ञानपीठात दोन दिवशीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये जिल्हयातील १२५  विद्याथ्र्यांनी आपली उपकरणासह सहभाग नोंदविला होता. या जिल्हास्तरीय  विज्ञानप्रदर्शनीमध्ये उच्चप्राथमिक गटातून कु.किमया कमलेश बुधवाणीने प्रथम क्रमाक पटाकाविला आहे. कु.किमया बुधवाणी ही मेहकर येथील सेंट्रल पब्लीक स्कुलची इयत्ता सहावीची विद्यार्थीनी आहे. कु.किमया हीने लाय फाय स्मार्ट सिटी हे उपकरण बनविले होते. तिच्याकिमया बुधवानीचे लाय फाय स्मार्ट सिटी उपकरण जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये प्रथम आले.  कु.किमयाला हिला शिक्षका वर्षा लंबे व प्राचार्य गजानन निकस यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. यावेळी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले,उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, प्राचार्य कैलास भिसडे,जिल्हा विज्ञान संघटनेचे अध्यक्ष निलेश चिंचोले, ज्ञानपीठाचे प्राचार्य निवृत्ती शिंदे तथा आदी  मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कु.किमया बुधवाणी चा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. कु.किमया बुधवाणीचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ज्ञानेश्वर गाडे यांनी केले.

असे आहे लाय फाय उपकरण
स्मार्ट फोनमधून एलईडी लाईटला ऑडिओ सिग्नल दिले.समोर असलेल्या सोलर पॅनलमध्ये सदर डाटा रिसिव्ह होतो. त्यानंतर सिग्नलचे आऊटपुट अ‍ॅम्पलीफायरच्या मदतीने स्पीकरला दिला. अशा प्रकारे डाटा ट्रान्सफर होतो. लाईट फिडेलीटी हे डाटा ट्रान्सफरचे इकोफ्रेन्डली माध्यम असून त्यांचा मानवी आरोग्यावर कुठलाही दुष्परीणाम होत नाही.

विज्ञानप्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांमधील बालवैज्ञानिकाला आपली उपकरण निर्मिती करण्याची संधी मिळत .विद्यार्थ्यां जिज्ञासा व संशोधक वृत्तीला चालना मिळते. विद्यार्थ्यांनी विज्ञानप्रदर्शनी सहभाग घेवून नवनवीन उपकणाची निर्मितीतून आपली क्षमता सिध्द करावी
कु.किमया कमलेश बुधवाणी. हिवरा आश्रम

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा