विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती संपन्न

कर्मयोगी संत प पू शुकदास महाराज संस्थापित विवेकानन विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संत गाडगेबाबा यांची जयंती शनिवारी ता.२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्त विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद,प.पू.शुकदास महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. चित्रा मोरे  तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. ज्ञानेश्वर गाडे  हे उपस्थित होते.
यावेळी  प्रा. ज्ञानेश्वर गाडे यांनी  बोलताना सांगितले की संत गाडगे बाबांनी समाजाला खरी गरज असलेल्या परिवर्तनाचा कर्मसिंद्धान्त आपल्या जगण्यातून महाराष्ट्रातील जनसामान्यापुढे अगदी सोप्या भाषेत मांडला. दिवस भर झाडू हातात घेऊन स्वच्छतेचे कार्य करणें आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनाची स्वच्छता करणें, हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होताअसेही पुढे बोलतांना सांगितले.
 यावेळी प्रा. समता कस्तुरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.गजानन गायकवाड, सहकार्यक्रम अधिकारी प्रा. गजानन ठाकरे, प्रा.मनीषा कुडके,प्रा.योगेश काळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी विद्यार्थी कु. अश्विनी काळे, परशुराम देशमुख, शालीकराम निकस, माधुरी गिरी यांनी संत गाडगे बाबा आणि त्यांच्या  कार्य विषयी मनोगते व्यक्त केली. शेवटी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्वाती लहाने व कु. सायली सपकाळ तर मान्यवरांचे आभार  कु. मनाली सपकाळ हिने मानले.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा