शहरी तसेच ग्रामीण भागात आजसुध्दा
मनोरंजनासाठी मोठ्याप्रमाणामध्ये
टि.व्ही.ला अधिक प्राधान्य दिले.
जाते. बातम्या,क्रीडा,चित्रपट,कार्टून यासाठी प्रत्येक वयोगटाची व्यक्तीची नजर टि. व्ही. वर
खिळलेली असते. मात्र आता टेलीकॉम रेग्युलेटरी ऑथॉरटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या नवीन
नियमानुसार व नवीन दरपत्रकानुसार डी.टी.एच धारकांना व केबलधारकांना नविन दर आणि
पॅकेजनुसार मनोरंजनासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. ट्रॉयच्या नविन नियमानुसार
ग्राहाकांना आपल्या आवडीनुसार चॅनेल निवडण्याची मुभा मिळाली असून चॅनलबाबत ग्रामीण तसेच शहरी
ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. नवीन दरानुसार ग्राहकांना २५० रूपयांपासून
६०० रूपयांपर्यंत दर महिन्याला मोजावे लागणार आहेत. केबल चालकांनाही नव्या
अटींमुळे अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. या नवीन धोरणाबदल ग्राहकांमध्ये संतप्त
प्रतिक्रीया उमटल्या आहेत. या धोरणात ग्राहकांना लाभ होणार आहे असे ट्रायचे म्हणणे
आहे. परंतु किमान भाडे आणि पुढील चॅनलचे दर पाहता हा दर किमान २५० रूपयांपासून ६००
रूपयांपर्यंत जातो. तसेच ही प्रक्रिया किचकट असल्याने गोंधळाचे वातावरण आहे.
सर्वसामान्य हे महिन्याच्या
बजेटमधील काही रक्कम केबलच्या
माध्यमातून दिडश ते दोनशे रूपये मनोरंजनासाठी बाजूला काढून ठेवत असतात. त्यांना या
रक्कमध्ये सर्व मनोरंजनाची चॅनेल्स बघालयला मिळत होती. मात्र आता त्यांना याच
रक्कमेत १५० ते ३०० रूपये जादा मोजावे लागणार आहेत.त्यामध्ये सर्वच चॅनेल बघायला
मिळतील याची खात्री नाही. नवीन धोरणाप्रमाणे चॅनेल निवडण्याची प्रक्रिया तर इतकी
किचकट आहे की केबलचालकांची तर दमछाक होत आहे. तर ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण झाला
आहे.
ग्रामीण भागामध्ये नविन चॅनेलचे पॅक
कसे निवडायचे,पैसे किती भरायचे हे ग्राहकांना कळत नाही. या नियमानुसार
ग्राहकांच्या मनोरंजन बॅजेटवर अतिरिक्त भार पडणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना
मनोरंजन अधिक महाग होणार आहे. पॅकेजमध्ये ठराविक चॅनेल दिसणार असल्यामुळे सर्व चॅनेल आता
पे्रक्षकांना यापुढे दिसणार नाहीत. म नोज मु-हेकर,
डि.टी.एच. ग्राहक हिवरा आश्रम
असे नवीन कंपन्याचे नवीन पॅक
झी पॅक साठी ३९ रूपये मोजावे लागणार
असून कॅलर्स पॅक साठी ३० रूपये तर सोनी हॅपी इंडिया पॅके ३१ रूपये तर स्टॉर हॅल्यू
पॅक साठी ४९ रूपये मोजावे लागतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा