आत्मानंद थोरहाते शिक्षक महासंघाच्या विभागीय संघटक पदी नियुक्त


कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विद्या मंदिरात कार्यरत असलेले सहाय्यक शिक्षक आत्मानंद परशराम थोरहाते यांची शिक्षक महासंघाच्या अमरावती विभागीय संघटक पदी शुक्रवारी ता.१ फेब्रुवारी रोजी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी नियुक्ती केली.
आत्मानंद थोरहाते हे विवेकानंद आश्रमाचे सहसचिव पदाची जबाबदारी संभाळत असून गेल्या १३ वर्षापासून विवेकानंद विद्या मंदिरात ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करीत आहेत. विवेकानंद विद्या मंदिराच्या क्रीडा क्षेत्रात विद्याथ्र्यांनी आजपर्यंत दैदिप्यमान यश संपादन केले असून राष्ट्रीय पातळीपर्यंत विद्याथ्र्यांचा सहभाग आहे. विद्याथ्र्यांना खेळाची गोडी लागावी,त्यांच्या शारीरीक विकासासाठी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच विवेकानंद आश्रमाच्या सेवाकार्यातही ते सदैव तत्पर असतात. आत्मानंद थोरहाते यांच्या नियुक्ती बद्दल विवेकानंद आश्रमाचे पदाधिकारी तसेच सर्व शैक्षणिक संस्थातील प्राचार्य,शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांनी आनंद व्यक्त करून अभिनंदन केले आहे.  यावेळी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप दांदडे, कार्याध्यक्ष गजेंद्रqसह राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.समाधान वाघ, प्रा.डॉ.व्यंकटेश खरात, प्रा.संजय पैठणे, महेश दौड, प्राचार्य प्रा.कैलास भिसडे, पर्यवेक्षक देवेंद्र मोरे, आत्माराम जामकर तसेच यावेळी बहुसंख्य शिक्षक वृंद उपस्थित होते.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा