विवेकानंद कृषी महाविद्यालयात लोकशाही पंधरवाडा साजरा

लोकशाही, निवडणूक व सुशासन या विषयावर शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लोकशाही व सुशासन व पंचायतीराज इत्यादीची  माहिती देण्यासाठी  २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. येथील  कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालीत विवेकानंद कृषी महाविद्यालय सोमवारी ता ११ रोजी  २६ जानेवारी ते 10 फेब्रुवारी याकाळात लोकशाही पंधरवाडयाचे औचित्य साधून लोकशाही,निवडणूक व सुशासन या विषयावर महाविद्यालयामध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन  करण्यात आला. या निबंध स्पर्धेत  विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षापासून ते चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी विवेकानंद कृषी महाविद्यालयातील  विद्यार्थी विद्यार्थिनींनी लोकशाही,निवडणूका व सुशासन या विषयावर  मराठी,हिंदी  व इंगजी या भाषेमध्ये निबंध लिहीले.
विवेकानंद कृषी महाविद्यालयात लोकशाही,निवडणूका व सुशासन पंधरवडयाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. सुभाष कालवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.समाधान जाधव,प्रा.पवन थोरहाते,प्रा.सायली जाधव,प्रा.मिनाक्षी कडू यांनी यशस्वीपणे पार पाडली.

महाविद्यालयीन विद्याथ्र्यांना लोकशाही,निवडणूका व सुशासन या विषयावर आपले विचार व्यक्त करण्याची संधी या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून मिळाली.  जान्हवी डोसे विद्यार्थी विवेकानंद कृषी महाविद्यालय


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा