विवेकानंद आश्रमात गुरूपौर्णिमेनिमित्त नेत्रतपासणी शिबीर




विवेकानंद आश्रमात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुरूपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने संपन्न केल्या जातो. या वर्षी दि.२७ जुलैला गुरूपौर्णिमा उत्सव संपन्न होणार आहे. गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सद्गुरूच्या शिकवणीनुसार मार्गक्रमण करण्याचा निश्चय करण्याचा हा दिवस आहे. कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजांनी आपले संपूर्ण जीवन दीन दुखी,पीडीतांच्या सेवेसाठी सर्मपित केले होते. आरोग्यसेवा हा त्यांच्या जगण्यातील अविभाज्य भाग होता म्हणून दि. २७ जुलै रोजी गुरूपौर्णिमेनिमित्त भव्य नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीगणपती नेत्रालय जालना येथील तज्ञ डॉक्टरांची चमू नेत्रतपासणी करणार असून गरजू रूग्णांना सवलतीच्या दरात ऑपरेशनची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आश्रमाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.गजानन गि-हे यांनी बोलतांना सांगीतले. साडे आठ वाजेपासून .पू.शुकदास महाराजश्रींच्या समाधीचे दर्शन,पूजन   नेत्रतपासणी शिबीराला सुरूवात होईल. सायंकाळी सामूदायिक प्रार्थना,अनुभूती भगद्गीतेवरील प्रवचन संपन्न होईल भक्तिगीत गायनाने कार्यक्रमाचा समारोप होईल. तरी परिसरातील रूग्णांनी नेत्रतपासणी शिबीराचा बहुसख्येने लाभ घेण्याचे आवाहन विवेकानंद आश्रमातर्फे असे कळविण्यात आले आहे.

विविध कार्यक्रमाचे आयोजन
गुरूपौर्णिमेनिमित्त दि. २७ जुलै ला सकाळी वाजता हरिहरतीर्थावर महाआरती दिंडीने ग्रामप्रदिक्षणा.  सकाळी वा. प्रार्थना,अनुभूति भगद्गीतेवर हभप निवृत्तीनाथ येवले शास्त्री हभप विष्णू  थुट्टे शास्त्री यांचे व्याख्यान संपन्न होणार आहे.

राज्य कार्यकारणी सदस्य पदी संजय दुणगू



वर्धा जिल्हयातील देवळी येथे आयोजीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक  शिक्षक समितीच्या राज्यकार्यकारणीच्या सभेत हिवरा आश्रम येथील शिक्षक संजय जानराव दुणगू यांची राज्य कार्यकारणी सदस्यपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. हिवरा आश्रम येथील शिक्षक तथा सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असलेले व्यक्तीमत्व म्हणून ते मेहकर तालुक्यात सुपरिचीत आहे. संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. यासोबत राज्यसहसचिव म्हणून प्रदीप अप्पार,विभागीय सरचिटणीस गजानन गायकवाड,विभागीय संपर्कप्रमुख विनोद कड तथा विभागीय सहसंघटक धनंजय डहाके यांची सुध्दा निवड करण्यात आली. यावेळी राज्याध्यक्ष उदय शिंदे,राज्य नेते काळू बोरसे, शिक्षक नेते शिवाजी साखरे, राज्यसरचिटणीस विजय कोंबे, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, राज्य प्रवक्ता आबा शिंपी,राज्य कोषाध्यक्ष केटुजी देशमाने,राज्य संपर्क प्रमुख राजेंद्र खेडेकर, राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर तसेच राज्य पदाधिकारी, सर्व जिल्हयाचे अध्यक्ष,सरचिटणीस उपस्थित होते.

अन्यायग्रस्त शिक्षकांसाठी तत्पर
हिवरा आश्रम येथील शिक्षक असलेले संजय दुगणू हे गेल्या दहा वर्षापासून जिल्हयातील शिक्षकांच्या विविध समस्या निवारण्यासाठी कार्य करीत आहेत. शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी शासन दरबारी नेहमीच प्रयत्नशील असतात. शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यातील अन्यायग्रस्त शिक्षकांचा मुद्दा शासन दरबारी ऐरणीवर घेतला होता.



संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

डिजीटल ज्ञानाने उजळला दिव्यांगाचा शैक्षणिक प्रवास !


 सोच को बदलो सितारे बदल जायेंगे...नजर को बदलो,नजारे बदल जायेंगे...कश्तियाँ बदलने की जरूरत नही... दिशाओं को बदलोकिनारे बदल जायेंगे...या काव्याप्रमाणे दिव्यांगाच्या जीवनातीलनकारात्मक विचारधारेला नष्ट करून त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत  करण्याचे काम विवेकानंद निवासी अपंग शाळेत होत आहेदिव्यांग विद्यार्थ्यांना सुध्दा डिजीटल युगात आपली क्षमता  बुध्दीमत्त्ता विकसीतकरण्याची संधी उपलब्ध व्हावीआधुनिक तंत्रज्ञानाच्या साहय्याने दिव्यांग विद्यार्थ्यांना सुध्दा हसत खेळत शिक्षण घेता यावे हया हेतूने  हिवरा आश्रम येथील विवेकानंद अपंग निवासी शाळेने डिजीटल क्लासरूमची सुविधासुरू केलीविवेकानंद निवासी अपंग शाळेच्या या डिजीटल क्लासरूमचा इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना लाभ होत आहेदिव्यांग विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन,वेळ  संधी मिळाल्यास यशमिळल्याशिवाय राहत नाही.याचा प्रत्यय हिवरा आश्रम येथील कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित अपंग विद्यालयात दिसून येतोया विद्यालयात कायम दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतव्यवसायाभिमुखतेचे धडे दिले जातात.
दिव्यांग विद्यार्थ्यांना   दिशा  मार्गदर्शन करून प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्याचा मुलमंत्र देण्याचे काम विवेकानंद अपंग शाळा गेल्या २४ ते २५ वर्षापासून करीत आहेडिजीटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पायाभरभक्कम होत आहेदिव्यांगाच्या जीवनात आनंद पेरण्याचे काम येथील विवेकानंद निवासी अपंग विद्यालय करीत आहेविवेकानंद अपंग विद्यालयातील समर्पित शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांना डिजीटल क्लासरूमव्दारेहसत खेळत शिक्षणाचे धडे देत आहेकला शिक्षक नंदा धाडकर,आत्माराम दळवी,ओंकार पुरी  निर्मला सांबपूरे आदींचे दिव्यांग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभ आहे.

हस्तकला निर्मितीचे धडे
विवेकानंद अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यावहारीक ज्ञानाचे धडे शिकविले जातातया विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणा सोबत स्वयंरोजगार संधी निर्माण होण्याच्या दृष्टीने मेणबत्याखडू,पायदानफुलदानी तयार करणेशाडूच्या मातीपासून विविध मूर्ती तयार करणे शिकविले जाते.

विवेकानंद अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना हसत खेळत क्लिष्ट  अवघड विषय सहज शिकता येतातडिजीटल क्लासरूमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीत वृध्दी झाली आहे.
                                                       सुनीता गोरे,मुख्याध्यापक विवेकानंद अपंग विद्यालय

'सुजलाम सुफलाम' खरे जलसाठा वर्धक - तहसीलदार संतोष काकडे


पाऊसाचा पडणारा  प्रत्येक थेंब वायाजाऊ नये, महाराष्ट्र राज्यातील दुष्काळाची गडद छाया नष्टव्हावी, धरणातील गाळ उपशातून जलसाठयात वाढ व्हावी, शेतात गाळ टाकून जमीनीची सुपीकता वाढावी या उदात्तहेतूने भारतीय जैन संघटना  बुलडाणा जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हयातील धरणातील गाळ उपसा करण्यासाठीसुजलाम् सुफलाम् अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.सुजलाम सुफलाम् अभियानामुळे कोराडी धरणातीलजलसाठयात वाढ झाली. सुजलाम् सुफलाम खरा जलसाठावर्धक असल्याचे विचार मेहकरचे तहसीलदार संतोष काकडेयांनी कोराडी जलपूजन प्रसंगी हिवरा आश्रम  येथे बोलतांनागुरूवारी दि. १९ रोजी काढले.
यावेळी जि..सदस्य संजय वडतकर,विवेकानंद आश्रमाचेउपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,भारतीय जैनसंघटनेचे मंगलचंद कोठारी,निलेश नाहटा,तलाठी राजेंद्रआव्हाळे,बि.जे.एस जिल्हा समन्वयक लक्ष्मण पवार,जगन्नाथखाकटेरवींद्र पोटदुखे,शांतुल केदारे,प्रशांत बोरेअरविंद धोंडगे,अरूण गावंडे,रामजी नाईक तथा आदीची उपस्थिती होती.

सावित्रीच्या लेकींच्या हस्ते जलपूजन
जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे कोराडी जलाशयातमोठया प्रमाणात वाढ झालीभारतीय जैन संघटनेच्या वतीनेजलपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन हिवरा आश्रम येथेकरण्यात आले होते.  यावेळी विवेकानंद आश्रमाच्याशैक्षणिक संस्थेत शिक्षण घेणा-यांना विद्यार्थींनींच्या हस्तेजलपूजन करण्यात आले.

 कोराडीच्या जलसाठयात होणार वाढ
भारतीया जैन संघटनेच्या वतीने  मार्च रोजी  कोरडीधरणातून गाळ उपसा कामास सुरूवात झालीतीन जेसीबी एक पोकलँडच्या मदतीने काम युध्द पातळीवर पार पडलेकोराडी धरणातुन  लाख ७५ हजार सहाशे सत्तर ब्रासगाळचा उपसा करण्यात आलागाळ उपसामुळे धरणाच्याजलसाठयात  लाख ३४ हजार सहाशे चौदा टीसीएम एवढयाजलसाठयात वाढ  होणार आहे.