पिकांच्या उगवण क्षमतावाढीसाठी बीज प्रक्रिया

विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थीनींनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत येथील हिवरा आश्रम येथील शेतक-यांना बीज प्रक्रिया म्हणजे काय, बीज प्रक्रिया का करावी,बीज प्रक्रियेचे फायदे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. शेतकरी बांधवांनी बियाण्याची शेतात पेरणी करण्यापूर्वी त्या बियाण्यावर बीज प्रक्रिया करणे आवश्यक असते.बीज प्रक्रिया केलेल्या बियाण्यांची पेरणी केल्यास उत्पादन वाढीसाठी मदत मिळते. बीज प्रक्रिया केल्याने रोगजंतूचे संक्रमण होऊन बी कुजणे,अंकुरण,व्यवस्थित होत नाही.बीज प्रक्रिया केल्यामुळे रोगांचे प्राथमिक अवस्थेतच निर्मूलन झाल्याने खर्चात मोठया प्रमाणात बचत,कपात होते.

विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थींनीनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत ग्राम हिवरा आश्रम येथील शेतक-यांना बीज प्रक्रियाचे प्रात्यक्षिक महत्व पटवून दिले. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुप मध्ये प्रज्ञा बागडे,जुही परचाके, भावना सरोदे, वैष्णवी बोर्डे, शिवगंगा मिसाळ, स्नेहल घुगे, कांचन सिरसाटनिकिता होणे, काजोल  पाटील, नितु जुनघरे या विद्यार्थीनींचा समावेश आहे. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थीनींना प्राचार्य डॉ.सुभाष कालवेप्रा.मनोज खोडकेप्रा.मंगेश जकाते, प्रा.गजानन ठाकरे, प्रा.समाधान जाधवप्रा.विवेक हमानेडॉ.प्रा.भानुदास भोंडेप्रा.पवन थोरहाते, यांच्या मार्गदर्शनाखाली शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहे. यावेळी नामदेव ताजने, तुकाराम कंकाळ, धंनजय बोकडे, भिकेश इंगळे, कांताबाई इंगळे यांचे सह परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. सर्वसाधरणपणे बीज प्रक्रिया म्हणजे हलके, किडके, रोगमुक्त, आकाराने लहान असणारे बियाणे वेगळे करून अशा बियाण्याचे रोग किडींपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्यापर्यंतच्या प्रक्रियेला बीजप्रक्रिया असे म्हणतात


बीज प्रक्रिया करतांना अशी घ्या काळजी
बीज प्रक्रियासाठी वापरायची औषधे सर्व बियाण्यास समप्रमाणास लागतील यावी काळजी घ्यावी. बियाण्याला कमी झाल्यास रोगापासून संरक्षण मिळत नाही किंवा जास्त झाल्यास बियाण्याला हानी पोहचते.बीज प्रक्रिया केलेले बियाणे लगेच हवाबंद किंवा प्लास्टिक पिशवीत भरू ठेवू नये. बीज प्रकिया केलेले बियाणे थंड किंवा कोरडया हवेत सावलीत २४ ते ४८ तास वाळवून घ्यावे. बीज प्रक्रिया केलेले बियाणे विषारी असल्यामुळे बीजप्रकियेनंतर हात स्वच्छ धुवून घ्यावेत.

अशी करा बीज प्रक्रिया
सर्वप्रथम कोरडा जागेत ताडपत्री किंवापोते घेऊन बियाणे पातळ थरामध्ये प्रसरावे. त्यावर किंचित प्रमाणात पाण्याचा शिंपडा करून बियाणे ओले करावे. त्यानंतर बियाण्यास लागणा-या रासायनिक बुरशीनाशकांचे प्रमाण घेऊन ते हलक्या हाताने बियाणे चोळून अर्धा तास सुकवावे.

बीज प्रक्रियेचे फायदे
बीज प्रक्रिया केल्यामुळे जमिनीतून बियाण्यांव्दारे पसरणा-या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. पिकांची उगवण क्षमता वाढते.पिकांची जोमदार वाढ होऊन पिकांच्या उत्पादनात वाढ होते. बीज प्रक्रिया ही घरी सहज शक्य असल्यामुळे कमी खर्चात रोग प्रतिबंधात्मक वाढ होते.


बीज प्रक्रिया केल्याने रोगजंतूचे संक्रमण होऊन बी कुजणे,अंकुरण,व्यवस्थित होत नाही.बीज प्रक्रिया केल्यामुळे रोगांचे प्राथमिक अवस्थेतच निर्मूलन झाल्याने खर्चात मोठया प्रमाणात बचत,कपात होते. आम्ही कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थीनींनी शेतकरी बंधूंना बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
                                                      कांचन सिरसाट, विवेकानंद कृषी महाविद्यालय


संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

बळीराजाची शेतीपयोगी अवजारे बनविण्यासाठी लगबग

 गेल्या आठवडयापासून शेतकरी चाचका प्रमाणे पावसाची वाट पाहत होता. हिवरा आश्रम परिसरातील शेती मशागतीची कामे अंतिम टप्यात आली आहेत. पावसाळयाने हजेरी लावल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या असून शेती उपयोगी अजवारे बनविण्याची घाई तो करीत आहे. पावसाळा तोंडावर आल्याने बळीराजा पेरणीसाठी आवश्यक असणारी शेतीपयोगी अवजारे, बनविण्याच्या कामात व्यक्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सुतार लोहार कारागिरांकडे शेती उपयोगी साहित्य बनविण्याचा ओघ मोठया प्रमाणात वाढला आहे.
शेती मशागती बरोबरच शेतीपयोगी वस्तू अवजारे बनविण्याचा वेग आला आहे. हायटेक शेतीमुळे शेतक-यांचे आर्थिक  जीवनमान उंचावले असेल  तरी आंतरमशागत, डवरणी, निंदणी , खत टाकणे आदि किरकोळ कामे शेतक-यांना विनायंत्रानेच करावी लागतात. त्यामुळे वखरी पास, कोळपणी पास, विळा, खुरपे, कुèहाड, टिकास, फावडे दुरूस्तीसाठी शेतकरी लोहाराकडे फेèया मारतांना दिसत आहेत. त्याशिवाय शेती अवजारे वखर,डवरे,पेरणीची तिफन,चाडे आदी अवजारे बनविण्यासाठी शेतकरी सुताराकडे येत आहेत. काळाच्या ओघात बाराबलुतेदार व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी येत असली तरी नसल्यापेक्षा  बरे या भावनेने अनेक कारागिर पिढीजात व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात सुतारी लोहारी व्यवसायाला घरघर लागली असली तरी पेरणींच्या काळात मात्र या व्यावसायिकांकडून काम करून घेण्याकडे शेतकèयांचा ओघ असतो. पूर्वी बलुते म्हणून वर्षभर कामाचा मोबदला एक पायली धान्य शेतकरी देत असत.

ग्रामीण कारागिरांकडे कामांचा ओघ
वखरी पास, कोळपणी पास, विळा, खुरपे, कु-हाड, टिकास, फावडे दुरूस्तीसाठी शेतकरी लोहाराकडे फे-या मारतांना दिसत आहेत. त्याशिवाय शेती अवजारे वखर,डवरे,पेरणीची तिफन,चाडे आदी अवजारे बनविण्यासाठी शेतकरी सुताराकडे येत आहेत.

सध्या बखराची पास,कोळपणी पास,कुदळ,विळा,खुरपे,कुèहाड  इत्यादी अवजाराने बनविण्याचे काम जोमात सुरू आहे. लोहारी व्यवसायासाठी कोळसा प्रामुख्याने कोळसा लागत असून कोळशाचे भाव वाढले आहेत. त्याचा व्यवसायावर परिणाम होत असला तरी पोटासाठी कमी नफ्यात हा व्यवसाय करावा लागत आहे.
                                    राजाराम पवार लोहार कारागीर हिवरा आश्रम

सुतारी व्यवसायात काळाच्या ओघात अनेक बदल होत गेले. दिवसेंदिवस लाकडाची कमतरता असल्याने शेती अवजारे ही लोखंडी बनविण्याचा कल वाढत आहे. तरी सुध्दा अनेक शेतकरी लाकडी शेती अवजारांना प्राधान्य देतात. सध्या शेती अवजारे बनविण्याच्या कामाला गती आली आहे.
                                      जगन्नाथ इंगळे सुतार कारागीर अंत्री देशमुख

संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८